मल्टीप्लग टाळा

पॉवर स्ट्रिप एक्स्टेंशन कॉर्डने स्मार्टफोन चार्ज करू नका किंवा मल्टी-प्लग करू नका: तुमचा स्मार्टफोन पॉवर स्ट्रिप एक्स्टेंशन कॉर्डने चार्ज करू नका. जर कार्ड सॉकेटपैकी एकातील एखादे उपकरण प्रभावित झाले तर ते तुमच्या स्मार्टफोनला देखील नुकसान करेल.
स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी लोकल अॅडॉप्टर वापरू नका: तुमचा स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी कंपनीने दिलेला चार्जर नेहमी वापरा. जर तुमचा चार्जर हरवला किंवा खराब झाला असेल तर नवीन चार्जर खरेदी करा. लोकल आणि नॉन-ब्रँडेड चार्जर फोनला मोठा धोका निर्माण करू शकते. आणि यामुळे तुम्हाला आर्थिक फटका देखील बसू शकतो.
नेहमी सेवा केंद्रांना प्राधान्य द्या

स्मार्टफोन कुठे दुरुस्त करायचा: तुमचा स्मार्टफोन नेहमी अधिकृत केंद्रातून दुरुस्त करून घ्यावा. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, त्याची सर्किटरी आणि मूळ भाग प्रभावित होत नाहीत. यासोबतच, अनधिकृत दुकाने तुमच्या माहितीशिवाय तुमचा डेटा चोरू शकतात किंवा धोकादायक अॅप्स इन्स्टॉल करू शकतात.
स्मार्टफोनवर दबाव टाकू नका : स्मार्टफोनवर कधीही जास्त दबाव टाकू नका. उदाहरणार्थ, बॅगमध्ये स्मार्टफोन ठेवला असता त्यावर कोणतीही जाड वस्तू ठेवू नका.
थेट सूर्यप्रकाश टाळा

स्मार्टफोनला थेट सूर्यप्रकाशात आणू नका (चार्ज करताना विशेष लक्ष द्या): तुम्ही तुमचा स्मार्टफोन थेट सूर्यप्रकाशात किंवा कारच्या डॅशबोर्डजवळ सारख्या गरम ठिकाणी ठेवून चार्ज करू नये. यामुळे गरम होण्याची समस्या वाढते. सामान्यतः तापमान ० ते ४५ अंश सेंटीग्रेड पर्यंत असते.
उशीखाली फोन चार्ज करू नका. अनेक वेळा लोक आपला स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी उशीखाली ठेवतात. असे कधीही करू नका. कारण, यामुळे तुमचा स्मार्टफोन गरम होऊ शकतो आणि आग लागण्यासारख्या गंभीर घटना घडू शकतात.
झोपताना स्मार्टफोन जवळ ठेवू नका

झोपतांना स्मार्टफोन जवळ ठेऊ नका : जवळ- जवळ सर्व्ह युजर्स असे करतात. अनेक वेळा लोक स्मार्टफोन जवळ ठेवून आणि विशेषतः उशीखाली किंवा अगदी बाजूला झोपतात. तुम्हीही असे करत असाल तर आजपासून ते करणे बंद करा. धोकादायक असण्यासोबतच, याचा झोपेवरही परिणाम होतो.
फोन चार्ज होत असताना इअरफोन प्लग करू नका: फोन चार्जिंगवर असताना संगीत ऐकू नका. फोन चार्जिंगवर असतांना गाणी ऐकण्यासाठी तुमचे इयरफोन प्लग इन केल्याने विद्युत शॉक लागू शकतो असे अलीकडील काही अहवालांमध्ये दिसून आले आहे .या वर्षी स्मार्टफोनच्या विजेच्या धक्क्याने अनेक मृत्यू देखील झाले आहेत
शर्टच्या खिशात स्मार्टफोन ठेवू नका

स्मार्ट फोन शर्टच्या खिशात ठेवू नका: अनेकांना हि सवय असते. शर्टाच्या खिशात स्मार्टफोन ठेवू नये असे वारंवार सांगण्यात येते. असे केल्यास त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
स्मार्टफोन जास्त चार्ज करू नका: अनेकांना ही वाईट सवय देखील असते. जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन बराच वेळ चार्ज करत असाल तर तो बंद करा. यामुळे ओव्हरहाटिंग होऊ शकते. फोनच्या ओव्हरहिटिंगमुळे अनेक गंभीर घटना घडू शकतात. फोन चार्ज केल्यानंतर, तो काळजीपूर्वक अनप्लग करा.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times