भारतात करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून महाराष्ट्रासह देशभरात करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकीकडे देशभरात लसीकरण जोरात सुरू आहे, तर दुसरीकडे करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे संकट पुन्हा वाढले आहे. करोना व्हायरसचे नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. करोना व्हायरसपासून बचावासाठी सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करणे, मास्क वापरणे गरजेचे आहेच. पण त्यासोबतच, आपल्या घरात काही महत्त्वाचे गॅजेट्स देखील असणे गरजेचे आहे. हे गॅजेट्स करोनापासून बचावासाठी खूपच उपयोगी येतील. करोना व्हायरसपासून बचावासाठी तुम्ही ऑक्सिमीटर, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स, फिटनेस बँड्ससह वेगवेगळ्या गॅजेट्सची मदत घेऊ शकता. याशिवाय सेनेटाइजर स्टिक, सेनेटाइजर बॉक्स, यूव्ही सेल्फ क्लिनिंग वॉटर बॉटल देखील खरेदी करणे गरजेचे आहे. अशाच काही उपयोगी गॅजेट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

सेलो ऑल इन वन पोर्टेबल सॅनिटायझर/स्टेरिलायझर/निर्जंतुक अतिनील प्रकाश, पांढरा, मध्यम

सेलो-ऑल-इन-वन-पोर्टेबल-सॅनिटायझर/निर्जंतुकीकरण-यूव्ही-लाइट-व्हाइट-मध्यम

करोना व्हायरस महामारीच्या काळात सेनेटाइजर बॉक्स खूपच लोकप्रिय झाले आहेत. याच्या मदतीने तुम्ही वारंवार उपयोगी येणाऱ्या छोट्या वस्तू सॅनेटाइज करू शकता. Cello चा हा सेनेटाइजर बॉक्स करोना काळात महत्त्वाचे गॅजेट आहे. याची किंमत २,७९९ रुपये आहे. परंतु, ५० टक्के डिस्काउंटनंतर फक्त १,२९९ रुपयात खरेदी करू शकता. या पोर्टेबल बॉक्सच्या मदतीने तुम्ही फोन, चावी, वॉलेट, दागिने आणि चष्मा यासारख्या वस्तू डिसइंफेक्टेड करू शकता.

एनएबीएल मान्यताप्राप्त लॅबद्वारे यूव्ही शुद्ध प्रमाणित

uv-शुद्ध-प्रमाणित-nabl-मान्यताप्राप्त-लॅब

या सेनेटाइजर स्टिकची किंमत ४,३९९ रुपये आहे. मात्र, अ‍ॅमेझॉनवरून ऑफर अंतर्गत फक्त २,७९९ रुपयात खरेदी करू शकता. हे Sanitizer Wand NABL द्वारे सर्टिफाइड आहे. या स्टिकला तुम्ही यूएसबी केबलद्वारे चार्ज करू शकता. याचा वापर करून फोन, लॅपटॉप व अन्य जागेवरील बॅक्टेरिया, व्हायरस व इतर कीटक नष्ट होतात. कंपनीचा दावा आहे की, याद्वारे फक्त १० ते १५ सेकंदांमध्ये जंतू, व्हायरस नष्ट होतात.

फिलिप्स वॉटर गोझीरो यूव्ही सेल्फ-क्लीनिंग स्मार्ट वॉटर बॉटल

philips-water-gozero-uv-सेल्फ-क्लीनिंग-स्मार्ट-वॉटर-बॉटल

करोना व्हायरस महामारीच्या काळात स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जेवणापासून ते पाण्यापर्यंत सर्व गोष्ट स्वच्छ असणे गरजेचे आहे. यासाठी Philips ची ही वॉटर बॉटल उपयोगी ठरते. फिलिप्सची ही सेल्फ क्लिनिंग बॉटल तुम्हाला खूपच उपयोगी ठरू शकते. ही आपोआप सेल्फ क्लीन होते. यात UV-C LED टेक्नॉलोजी दिली असून, याद्वारे बॉटल आपोआप स्वच्छ होण्यासोबतच वास देखील निघून जातो. बॉटलला यूएसबी केबल आणि रिचार्जेबल बॅटरीद्वारे चार्ज करू शकता. याची किंमत जवळपास १३ हजार रुपये आहे.

वांडेले पोर्टेबल होम ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन

vandelay-पोर्टेबल-होम-ऑक्सिजन-केंद्रक-मशीन

करोना व्हायरस महामारीच्या काळात प्रत्येक घरात Oxygen Concentrator Machine असणे गरजेचे आहे. या ऑक्सिजन Concentrator Machine ला तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून स्वस्तात खरेदी करू शकता. याची मूळ किंमत ६९,९९९ रुपये आहे. परंतु, ६१ टक्के डिस्काउंटनंतर फक्त २६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यासोबत नोझल, मास्क देखील मिळतो. या Oxygen Concentrator Machine ला रिमोटने देखील ऑपरेट करू शकता. या मशीनमध्ये एलईडी डिस्प्ले दिला आहे.

SINGCALL होम केअरिंग अलार्म सिस्टम वायरलेस केअरगिव्हर पेजर नर्स कॉलिंग अलर्ट

सिंगकॉल-होम-केअरिंग-अलार्म-सिस्टम-वायरलेस-केअरगिव्हर-पेजर-नर्स-कॉलिंग-सूचना

घरात लहान मुलं अथवा वृद्ध व्यक्ती असेल तर या वायरलेस अलार्म सिस्टमला तुम्ही खरेदी करू शकता. घरात वृद्ध आजारी व्यक्ती असल्यास या वायरलेस अलार्म सिस्टमचा खूप उपयोग होईल. याची किंमत फक्त ४,३९९ रुपये आहे. डिव्हाइसला गळ्यात अडकवू शकता अथवा कमरेला देखील बांधता येईल. यात एक बटन दिले असून, जे प्रेस केल्यावर अलार्म वाजेल. यात एक पेजर आणि रिसिव्हर देखील आहे. पेजर बटन दाबल्यास रिसिव्हर पॅडवर अलार्म वाजतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here