Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल १७ जानेवारी २०२२ च्या मध्यरात्रीपासून सुरू होत आहे. जो २० जानेवारी २०२२ च्या रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. Prime Members २४ तास आधीच या सेलचा आनंद घेऊ शकतील. तुम्ही जर नवीन स्मार्टफोनखरेदी करायचा विचार करत असाल तर ही संधी गमावू नका.सेलमध्ये ग्राहक स्मार्टफोनवरकाही जबरदस्त डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात. स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर ५० टक्के आणि घरगुती उपकरणांवर ८० टक्के सूट असेल.अॅक्सेसरीज ४०% डिस्काउंटवर खरेदी करता येतील. तसेच, ग्राहकांना SBI क्रेडिट कार्डने केलेल्या खरेदीवर १० टक्के इन्स्टंट सूट मिळेल. सेलमध्ये नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करण्याची संधी असेल. तसेच, जास्तीत जास्त १६,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर असेल. याशिवाय, ग्राहक पे अँड शॉप रिवॉर्ड्सवर ४,५०० रुपयांच्या सवलतीचा आनंद घेऊ शकतील. जाणून घ्या टॉप स्मार्टफोन डील्स.

iQOO Z3 5G

iqoo-z3-5g

स्मार्टफोन १७,९९० तुम्हला रुपयांना मिळेल. या फोनमध्ये ६.५८ इंचचा एलसीडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये १८० हर्ट्झचा टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे. आयक्यूओ झेड ३ ५ जीच्या पडद्यावर गोरिल्ला संरक्षण देण्यात आले आहे. हा फोन फंटच ओएस ११.१ वर आधारीत अँड्रॉइड ११ वर काम करतो. हा फोन ५ जी बेस्ड आहे. फोनला अधिक मजबूत बनविण्यासाठी ४०४० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

iQOO Z5 5G: नुकताच लाँच केलेला iQOO Z5 5G स्मार्टफोन ७,००० च्या सवलतीत २२,९९० मध्ये खरेदी करता येईल.स्मार्टफोनमध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आहे.हा स्मार्टफोन वेगवेगळ्या मेमरी प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे. iQOO Z5 5G मध्ये ६.६७ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे आणि पंचहोल डिस्प्ले आहे.

Samsung Galaxy S20 FE 5G

samsung-galaxy-s20-fe-5g

Samsung S20 FE 5G स्मार्टफोन सेलमध्ये ३६,९९० रुपयांना मिळेल. निवडक बँकेतून फोन खरेदीवर १५०० रुपयांची सूट दिली जात आहे. स्मार्टफोन मध्ये ६.५ इंचाचा फुल HD+ सुपर AMOLED इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० Hz आहे. अँड्रॉयड ११ ओएसवर काम करतो. फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. यात ८ GB रॅम आणि १२८ GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये कॅमेरा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

Samsung Galaxy M52 5G आणि Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोन देखील या सेलमध्ये ७००० रुपयांच्या सवलतीत खरेदी केले जाऊ शकतात.

Tecno Pop 5 LTE

tecno-pop-5-lte

Tecno Pop 5 LTE स्मार्टफोन यामध्ये ६,२९९ मध्ये येईल. टेक्नोच्या पॉप सिरीजचा हा नवीन सदस्य आहे. Tecno Pop 5 LTE ला ५००० mAh बॅटरीचे समर्थन आहे आणि ते १४ स्थानिक भाषांना देखील समर्थन देते. Tecno Pop 5 LTE गेल्या वर्षी पाकिस्तान आणि फिलीपिन्समध्ये लाँच करण्यात आले होते. Tecno Pop 5 LTE मध्ये ६.५२ -इंचाचा डिस्प्ले आहे.

Samsung S20 FE 5G: Samsung S20 FE 5G स्मार्टफोन सेलमध्ये ३६,९९० रुपयांना मिळेल. निवडक बँकेतून फोन खरेदीवर १५०० रुपयांची सूट दिली जात आहे. Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन मध्ये ६.५ इंचाचा फुल HD+ सुपर AMOLED इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० Hz आहे. यात ८ GB रॅम आणि १२८ GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. शानदार कॅमेरा या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

Redmi Note 11T 5G

redmi-note-11t-5g

सेलमध्ये Redmi Note 11T 5G आणि Xiaomi 11T Pro 5G वर मोठ्या बँक सवलती दिल्या जात आहेत. Redmi 9 सीरीजचे स्मार्टफोन्स ६,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असतील. Redmi Note 10S, Redmi Note 10 Pro, Redmi Note 10 Pro Max आणि Redmi Note 10 Lite स्मार्टफोन्सची सुरुवातीची किंमत १२,९९९ आहे. Redmi चे स्मार्टफोन खरेदी करण्याची ग्राहककांडे ही एक चांगली संधी आहे.

OnePlus 9 5G: OnePlus 9 5G Series स्मार्टफोन Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्येबँक सवलतीसह खरेदी करता येईल. यावर ३६,९९९ रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे.

वन प्लस 9आरटी

वन-प्लस-9rt

OnePlus 9RT 5G स्मार्टफोन ४००० रुपयांच्या तात्काळ सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असेल. फोनमध्ये ५० MP+१६ MP अल्ट्रा-वाइड आणि २ MP मॅक्रो कॅमेर्‍यांसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. OnePlus 9RT मध्ये १६ MP फ्रंट कॅमेरा आहे आणि तो नाईट मोड, HDR इत्यादी सर्व वैशिष्ट्यांसह मागील कॅमेरामध्ये येतो. OnePlus मुख्य ५० MP कॅमेरासाठी Sony IMX766 सेन्सर आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड ११ -संचालित OxygenOS सह आउट-ऑफ-द-बॉक्स येईल. फोनमध्ये ४५०० mAh ड्युअल-सेल बॅटरी आहे.

iPhone 12: iPhone 12 सेलमध्ये ५६,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा फोन अनेक युजर्सची पहिली पसंत आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here