भारतीय बाजारात अनेक कंपन्या स्मार्ट टीव्हीची मोठी रेंज सादर करत आहेत. साधा टीव्ही खरेदी करण्याऐवजी ग्राहक आता कमी किंमतीत येणाऱ्या स्मार्ट टीव्हीला प्राधान्य देताना दिसत आहे. थोडे अधिक पैसे खर्च करून इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि अ‍ॅप्स सपोर्टसह येणारे स्मार्ट टीव्ही ग्राहक खरेदी करत आहेत. ग्राहकांची मागणी पाहता कंपन्या देखील स्वस्तात मस्त स्मार्ट टीव्ही लाँच करत आहे. तुम्ही जर नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. Blaupunkt कडून ३२ इंच ते ६५ इंच स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट दिले जात आहे. या स्मार्ट टीव्हीला तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart च्या माध्यमातून खरेदी करू शकता. Blaupunkt TV ला Flipkart, तर Westinghouse TV ला Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

​सेलमध्ये मिळेल आकर्षक ऑफर्सचा फायदा

१७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या Flipkart Big Saving Days Sale मध्ये आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल. सेलमध्ये Blaupunkt Smart TVs ला ७० टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता. ICICI बँक कार्डवर १० टक्के इंस्टंट डिस्काउंटचा देखील लाभ मिळेल. याशिवाय टीव्हीला ईएमआयवर देखील खरेदी करता येईल.

१७ जानेवारीलाच Amazon Great Republic Day Sale सेल सुरू होत आहे. या सेलमध्ये Westinghouse Smart TV ला ५० टक्क्यांपर्यंतच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. तसेच, एसबीआय बँक होल्डला १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. टीव्हीला नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदीचा देखील पर्याय आहे.

​Blaupunkt Cyber Sound स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर

blaupunkt-सायबर-ध्वनी-

Blaupunkt Cyber Sound च्या ३२ इंच स्मार्ट टीव्हीला तुम्ही २ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह फक्त १२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या स्मार्ट टीव्हीमध्ये ४० वॉट स्पीकर आउटपूटचा सपोर्ट मिळतो. कंपनीच्या ४२ इंच स्मार्ट टीव्हीला तुम्ही २ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर १९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये ४२ इंच फुल एचडी प्लस स्क्रीन दिली असून, याचे रिझॉल्यूशन १९२०x१०८० पिक्सल आहे. यात ड्यूल स्पीकरसह ४० वॉट आउटपूट सपोर्ट मिळतो.

​Blaupunkt च्या ४३ इंच स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर

निळा बिंदू

Blaupunkt च्या ४३ इंच स्मार्ट टीव्हीला तुम्ही सेलमध्ये ४ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर २६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यात अल्ट्रा एचडी स्क्रीन दिली असून, याचे रिझॉल्यूशन ३८४०x२१६० पिक्सल आहे. यात ५० वॉट स्पीकर आउटपूट सपोर्ट मिळतो. तसेच, क्वाड स्पीकरचा सपोर्ट दिला आहे.

५० इंच अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्हीला २ हजार रुपये डिस्काउंटनंतर ३३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. हा टीव्ही अँड्राइड १० वर काम करतो. यात ६० वॉट स्पीकर आउटपूट दिला आहे.

​५५ इंच आणि ६५ इंच स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर

५५ इंच एल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्ही ३८४०x२१६० पिक्सल रिझॉल्यूशनसह येतो. टीव्हीला ४ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर ३६,९९९ रुपयात खरेदी करता येईल. यात ६० वॉट स्पीकर आउटपूट आणि गुगल असिस्टेंटचा सपोर्ट मिळतो.

६५ इंच अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्हीला ३ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर ५२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. हा अँड्राइड टीव्ही १० ओएसवर काम करतो. यात ६० वॉट स्पीकर आउटपूट, ४ स्पीकर्स दिले आहे. टीव्ही ५०० नीट्स पीक ब्राइटनेससोबत येतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here