नवीन स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करायचा प्लान करत असाल तर याकरिता आता तुम्हाला अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही. Xiaomi रिपब्लिक डे सेल २१ जानेवारीपर्यंत लाइव्ह असेल. म्हणजेच तुम्ही या सेल दरम्यान Redmi आणि Mi स्मार्टफोन्सवर प्रचंड सवलतींचा लाभ मिळवू शकता. या सेलमध्ये तुम्हाला कोणते मोबाईल डिस्काउंटसह मिळतील आणि तुम्ही यावर नेमकी किती बचत करू शकाल त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या. याशिवाय, ग्राहक बँक ऑफ बडोदा डेबिट आणि क्रेडिट कार्डवर १९ इन्स्टंट टक्के सूट देखील घेऊ शकतात. ग्राहकांसाठी हँडसेटसह अनेक ऑफर देखील लिस्ट आहेत. सेलमध्ये Xiaomi 11 Lite NE 5G, Redmi Note 10S, Redmi Note 10 Pro सारख्या काही भन्नाट आणि लोकप्रिय हॅंडसेट्सवर ऑफ मिळत आहे. लिस्ट पाहा आणि ठरवा तुम्हाला यापैकी कोणता स्मार्टफोन खरेदी करायचा.

Redmi Note 10 Pro

redmi-note-10-pro

Redmi Note 10 Pro: Redmi Note 10 Pro या Redmi मोबाइल फोनचा ६ GB RAM / १२८ GB व्हेरिएंट विक्रीदरम्यान १७,९९९ च्या किंमतीसह विकला जाईल आणि ग्राहकांना बँक ऑफ बडोदा डेबिट-क्रेडिट कार्डवर १० टक्के फायदा घेता येईल. याशिवाय जुना फोन दिल्यावर तुम्हाला १७,५००० रुपयांपर्यंत Mi एक्सचेंज आणि 500 रुपयांची अतिरिक्त सूटही Redmi Note 10 Pro वर मिळेल. ग्राहकांच्या सोयीसाठी, निवडक कार्ड्सवर नो कॉस्ट EMI सुविधा देखील Redmi Note 10 Pro वर उपलब्ध आहे.

Redmi 9A

redmi-9a

Redmi 9A: तुम्ही या बजेट स्मार्टफोनचे ३ GB RAM / ३२ GB स्टोरेज व्हेरिएंट विक्रीमध्ये ७,९९९ रुपयांच्या किंमतीसह खरेदी करू शकता. बँक कार्डवर १० टक्के इन्स्टंट सवलत घेण्यास सक्षम असाल. याशिवाय, जुना फोन दिल्यावर Mi Exchange चा ६,५०० रुपयांपर्यंतचा फायदा देखील Redmi 9A च्या खरेदीवर तुम्हाला मिळेल. फोनमध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले ऑफर केले आहे.फोटोग्राफीसाठी फोनमध्ये सिंगल कॅमेरा यूनिट दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

रेडमी 10 प्राइम

redmi-10-prime

Redmi 10 Prime: या Redmi स्मार्टफोनचा ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंट १४,४९९ रुपयांना विकला जातो. पण, ग्राहकांना या सेलमध्ये अतिरिक्त बचत करण्याची संधी असेल. बँक ऑफ बडोदा क्रेडिट-डेबिट कार्डवर १० टक्के तात्काळ सूट देण्यात येईल. MobiKwik वरून पेमेंटवर ४०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. (कोड -MBK400).तसेच, तुम्ही तुमचा जुना फोन दिला तर १०,५०० रुपयांपर्यंत Mi Exchange चा फायदा देखील मिळवू शकता. Redmi चा हा मस्त स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करण्याची ही एक चांगली संधी आहे.

Xiaomi 11 Lite NE 5G

xiaomi-11-lite-ne-5g

Xiaomi 11 Lite NE 5G: Xiaomi 11 Lite NE 5G या हँडसेटच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत जरी २६,९९९ रुपये असली तरी सेल दरम्यान Xiaomi 11 Lite NE 5G अनेक ऑफर्ससह विकला जाईल. बँक ऑफ बडोदा डेबिट-क्रेडिट कार्डवर ४५०० रुपयांची फ्लॅट डिस्काउंट म्हणजेच ६ जीबी रॅम व्हेरिएंट २२,४९९ रुपयांना उपलब्ध असेल. एक्सचेंजवर ५००० रुपयांची अतिरिक्त सूट असेल. प्रीपेड व्यवहारांवर १००० रुपयांच्या अतिरिक्त सवलतीसह ५०० रुपयांच्या रिवॉर्ड मी कूपनचाही फायदा मिळेल. याशिवाय, व्याजाशिवाय ईएमआयचीही सुविधा देखील उपलब्ध आहे.

Redmi Note 10S

redmi-note-10s

Redmi Note 10S: सेल दरम्यान, ग्राहक Redmi Note 10S या Redmi मोबाइल फोनचे ६ GB रॅम आणि ६४ GB व्हेरिएंट १३,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतील. परंतु, जर तुम्हाला या Redmi Note 10S मॉडेलवर अधिक सूट हवी असेल, तर त्यासाठी तुम्हाला ऑफरचा अवलंब करावा लागेल. तुम्ही बँक ऑफ बडोदा डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरले तर १० टक्के झटपट सवलत देखील मिळवू शकता. तसेच, Mi Exchange सोबत १४,५०० आणि ५०० रुपयांपर्यंतचे एक्सचेंज ऑफर देखील मिळवू शकता. बजेट किमतीत Redmi Note 10S एक चांगला पर्याय आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here