आयफोन १२

Amazon Great Republic Day Sale मध्ये Apple iPhone 12 ला खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. सेलमध्ये आयफोन १२ फक्त ५३,९९९ रुपयात उपलब्ध आहे. ही फोनच्या ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. फोनची मूळ किंमत ५९,९९९ रुपये आहे. तर १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६१,९९९ रुपये आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी रियरला १२ मेगापिक्सल + १२ मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.
OnePlus 9R 5G

OnePlus 9R या ५जी स्मार्टफोनला ३ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर ३६,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. याशिवाय फोनला अॅमेझॉन एसबीआय कार्डने खरेदी केल्यास ३ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंटचा देखील फायदा मिळेल. फोनमध्ये ६.५५ इंचाचा शानदार डिस्प्ले दिला आहे. तर पॉवरसाठी ४५०० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सल + १६ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
Samsung Galaxy M32 5G

Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनची मूळ किंमत २२,९९९ रुपये आहे. परंतु, सेलमध्ये फक्त १८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ही फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा शानदार डिस्प्ले दिला आहे. तर पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोटोग्राफीसाठी यात फ्रंटला १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि रियरला ४८ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे.
Redmi Note 10S

Redmi Note 10S स्मार्टफोन अॅमेझॉन सेलमध्ये १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. रेडमीच्या या फोनला १ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर १३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय एसबीआय कार्डवर १,२५० रुपये इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. फोनमध्ये ६.४३ इंचाचा शानदार डिस्प्ले मिळतो. फोटोग्राफीसाठी यात ६४ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर फ्रंटला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे.
Realme Narzo 50A

Realme narzo 50A स्मार्टफोन देखील सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध आहे. सेलमध्ये फोनवर १ हजार रुपये सूट दिली जात आहे. यासाठी एक कूपन सिलेक्ट करावे लागेल. या फोनला ११,४९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. Realme narzo 50A स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच डिस्प्ले मिळतो. तर पॉवरसाठी ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो. तर सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times