भारतीय बाजारात दर आठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच होत आहेत. २० ते २५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या फोन्सला ग्राहकांची सर्वाधिक मागणी पाहायला मिळत आहे. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात काही शानदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. तुम्हाला जर स्टोरेज, डिस्प्ले, कॅमेरा आणि प्रोसेसर अशा सर्वच बाबतीत परिपूर्ण फोन हवा असल्यास थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतील. तुमचे बजेट जर ३० हजार रुपये असल्यास पोकोपासून शाओमीपर्यंत काही चांगले फोन्स खरेदी करू शकता. या बजेटमध्ये भारतीय बाजारात Xiaomi 11i 5G, OnePlus Nord 2 5G, Poco F3 GT, Samsung Galaxy M32 5G आणि Xiaomi 11i HyperCharge 5G हे फोन्स उपलब्ध आहेत. एकापेक्षा एक शानदार फीचर्ससह येणाऱ्या या स्मार्टफोनविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Xiaomi 11i 5G

xiaomi-11i-5g

शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात ऑक्टा कोर MediaTek Dimensity ९२० ५जी प्रोसेसर मिळतो. फोटोग्राफीसाठी रियरला १०८ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५१६० एमएएचची बॅटरी मिळते. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २६,९९९ रुपये आहे.

OnePlus Nord 2 5G

oneplus-nord-2-5g

OnePlus Nord 2 5G मध्ये ६.४३ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. यात ऑक्टाकोर मीडियाटेक डायमेंसिटी १२०० प्रोसेसर दिला आहे. फोन अँड्राइड ११ आधारित OxygenOS ११.३ वर काम करतो. यात रियरला ५० मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. यात ४५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये आहे.

थोडे F3 GT

थोडे-f3-gt

Poco F3 GT स्मार्टफोन ६.६७ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल, आस्पेक्ट रेशियो २०:९ आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेंसिटी १२०० प्रोसेसर दिला आहे. तसेच, फ्रंटला १६ मेगापिक्सल एचडीआर कॅमेरा, रियरला ६४ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०६५ एमएएचची बॅटरी मिळते. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २६,९९९ आहे.

Samsung Galaxy M32 5G

samsung-galaxy-m32-5g

Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनमध्ये ६.५० इंच TFT डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आणि आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. यात ऑक्टा कोर MediaTek MT६८५३ Dimensity ७२० ५G प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. रियरला ४८ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. यात पॉवरसाठी १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे.

Xiaomi 11i हायपरचार्ज 5G

xiaomi-11i-हायपरचार्ज-5g

या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात ऑक्टाकोर मीडियाटेक डायमेंसिटी ९२० ५जी प्रोसेसर मिळतो. फोटोग्राफीसाठी रियरला १०८ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात स्टोरेजला ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. तर पॉवरसाठी १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २८,९९९ रुपये आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here