आज लॅपटॉप प्रत्येकाची गरज बनली आहे. ऑफिस, कॉलेजची अनेक महत्वाची कामं आजकाल लॅपटॉपवरच पूर्ण होतात. याद्वारे तुम्ही मनोरंजनासोबतच महत्वाची कामे आणि आणि अभ्यासही करू शकता.आता एक चांगला लॅपटॉप खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. बजेट किमतीत देखील चांगला लॅपटॉप घरी आणता येतो. तुम्ही स्वत:साठी नवीन लॅपटॉप शोधत असाल आणि तुमचे बजेट २५ हजार रुपयांच्या जवळपास असेल, तर क्रोमबुक तुमच्यासाठी बाजारात योग्य पर्याय ठरू शकतो. असे लॅपटॉप मुख्यतः Google च्या Chrome ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात जे Android अॅप्सला समर्थन देतात. जे युजर्स ऑनलाइन क्लाससाठी किंवा घरून काम करण्यासाठी लॅपटॉप शोधत आहेत, त्यांच्यासाठी Chromebook चांगला पर्याय ठरू शकतात. किमतीमध्ये थोडाफार बदल असू शकतो . यात HP Chromebook MediaTek MT8183, Acer Chromebook 311 C733-C5A, सारख्या काही जबरदस्त लॅपटॉप्सच्या समावेश आहे.

Lenovo Chromebook 14e

lenovo-chromebook-14e

Lenovo Chromebook 14e: फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या Lenovo लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा FHD डिस्प्ले आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर या लॅपटॉपमध्ये ४ GB रॅम आणि ६४ GB इंटरनल स्टोरेज आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Lenovo Chromebook 14e ची किंमत २४,९९० रुपये आहे. या लॅपटॉपमध्ये G-Suite इंटिग्रेशन देखील उपलब्ध आहे. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर, एका चार्जवर ती 10 तास टिकते. या Chromebook ला मिलिट्री दर्जाचे प्रमाणपत्र मिळते, जे जल-प्रतिरोधक कीबोर्डने सुसज्ज आहे.

Asus Chromebook C223

asus-chromebook-c223

Asus Chromebook C223: या Asus लॅपटॉपमध्ये ११.६ इंच डिस्प्ले आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा लॅपटॉप क्रोम ओएसवर काम करतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर या लॅपटॉपमध्ये ४ GB रॅम आणि ३२ GB इंटरनल स्टोरेज आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर Asus Chromebook C223 लॅपटॉप इंटेल ड्युअल कोअर सेलेरॉन एन 3350 प्रोसेसरवर काम करतो. हा एक हलका आणि सडपातळ लॅपटॉप आहे ज्याचे वजन १ किलोपेक्षा कमी आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Asus Chromebook C223 ची किंमत २३,९६६ रुपये आहे.

Asus Chromebook फ्लिप

asus-chromebook-flip

Asus Chromebook फ्लिप: या Asus लॅपटॉपमध्ये ३६० डिग्री परिवर्तनीय टच-स्क्रीन डिस्प्ले आहे. या लॅपटॉपला मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी सर्टिफिकेशन मिळते. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर हा लॅपटॉप इंटेल सेलेरॉन प्रोसेसरवर काम करतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर या लॅपटॉपमध्ये ४ GB रॅम आणि ६४ GB इंटरनल स्टोरेज आहे. ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत हा लॅपटॉप क्रोम ओएसवर काम करतो. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर, हा लॅपटॉप एका चार्जवर १० तास चालतो. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Asus Chromebook Flip ची किंमत २४,९९९ रुपये आहे.

Acer Chromebook 311 C733-C5A

acer-chromebook-311-c733-c5a

Acer Chromebook 311 C733-C5A: या Acer Chromebook मध्ये ११.६ -इंचाचा डिस्प्ले आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर Acer Chromebook 311 C733-C5A लॅपटॉपमध्ये ४ GB रॅम आणि ३२ GB इंटरनल स्टोरेज आहे. या लॅपटॉपमध्ये इंटेल UHD ग्राफिक्स ६०० देण्यात आला आहे. बॅटरी बॅकअपबद्दल सांगायचे तर, कंपनीचा दावा आहे की हा लॅपटॉप एका चार्जवर १२.५ तासांची बॅटरी लाइफ देतो. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Acer Chromebook 311 C733-C5A लॅपटॉपची किंमत २३,९९० रुपये आहे.

HP Chromebook MediaTek MT8183

hp-chromebook-mediatek-mt8183

या HP लॅपटॉपमध्ये ११.६ -इंचाचा डिस्प्ले आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर या लॅपटॉपमध्ये MediaTek प्रोसेसर देण्यात आला आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, हा लॅपटॉप क्रोम ओएसवर काम करतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर, या लॅपटॉपमध्ये ४ GB रॅम आणि ६४ GB इंटरनल स्टोरेज आहे. हा एक स्लिम लॅपटॉप आहे. लॅपटॉप एका चार्जवर १२ तासांचा बॅटरी बॅकअप देते. या लॅपटॉपमध्ये गुगल असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे. किमतीबद्दल बोलायचे झाले तर HP Chromebook MediaTek MT8183 ची किंमत २३,४९० आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here