आज आपल्या जवळपास सर्वांकडे स्मार्टफोन आहे. मोबाईल फोनच्या आगमनाने आज आपली अनेक कामे सोपी झाली आहेत. आज स्मार्टफोनचा वापर वैयक्तिक वापर, व्यवसाय, शिक्षण इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मोबाईल फोनमुळे आपली जीवनशैली देखील मोठ्या प्रमाणात बदलली आहे. आज लोक तासन् तास मोबाईल फोन वापरतात. त्यामुळे त्यांच्या वागण्यातही मोठा बदल दिसून येत आहे. दुसरीकडे, बर्‍याच मोबाईल फोन वापरकर्त्यांची ही एक सामान्य समस्या आहे की त्यांचा स्मार्टफोन लवकर खराब होतो. तुम्हालाही तुमचा स्मार्टफोन वर्षानुवर्षे कोणत्याही व्यत्ययाशिवाय वापरायचा असेल तर काही सोप्पी टिप्स फॉलो कराव्या लागतील. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही तुमचा स्मार्टफोन दीर्घकाळ कोणत्याही व्यत्ययाशिवाय आणि अडचणीशिवाय वापरण्यास सक्षम असाल. जाणून घेऊया या टिप्स ज्या तुमच्या मोबाईलला अनेक वर्ष चांगला ठेवण्यात तुमची मदत करेल.

अॅप्स

अॅप्स

विश्वसनीय अॅप्स वापरा: अनेकांना फोनमध्ये वेग- वेगळे अप्स डाउनलोड करण्याची सवय असते. पण, येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे तुमच्या स्मार्टफोनवर नेहमी विश्वसनीय अॅप्सच इन्स्टॉल करा. यामुळे स्मार्टफोनला कोणत्याही प्रकारचा धोका राहणार नाही. अनेकदा अनेक वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनवर अविश्वसनीय अॅप्स इन्स्टॉल करतात. असे केल्याने तुमच्या स्मार्टफोनमध्ये मालवेअर, बग किंवा व्हायरस येण्याचा धोका वाढतो. यामुळे तुमच्या फोनमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.असे झाल्यास फोन दीर्घकाळ टिकू शकणार नाही.

स्क्रीन गार्ड-केस

स्क्रीन-गार्ड-केस

स्क्रीन गार्ड आणि केसचा वापर करा : स्मार्टफोन जर अनेक वर्षे टिकवून ठेवायचा असेल तर स्मार्टफोन युजर्सनी त्यांच्या मोबाईल फोनसाठी नेहमी स्क्रीन गार्ड केसचा वापर करावा. अनेकदा असे दिसून येते की, अचानक आपला मोबाईल हातातून निसटतो आणि खाली पडतो. अशात स्क्रीन तुटण्याचा धोका वाढतो. या कारणासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये स्क्रीन गार्ड आणि केस वापरणे आवश्यक आहे. असे केल्याने कधी तुमच्या हातून तुमचा फोन खाली पडला तरीही तो सुरक्षित राहील.

सुरक्षितता

सुरक्षितता

स्मार्टफोन नेहमी सुरक्षित ठिकाणी ठेवा: स्मार्टफोनचा वापर करतांना विशेष काळजी घ्यावी. म्हणजेच, स्मार्टफोन सुरक्षित ठिकाणी वापरावा. फोन आग किंवा पाण्यापासून दूर ठेवणे आवश्यक आहे. कधी- कधी फोन पाण्यात पडून कायमचा खराब होऊ शकतो आणि तुम्हाला यामुळे आर्थिक फटका देखील बसू शकतो. अनेक युजर्सचा फोन दीर्घकाळ न टिकण्यामागे हे देखील एक कारण आहे. स्मार्टफोन युजर्स त्यांचा फोन सुरक्षित ठिकाणी ठेवत नाहीत. स्मार्टफोनची जितकी जास्त काळजी घ्याल तितकाच तो अधिक काळ टिकेल.

ओव्हर चार्जिंग

जास्त चार्जिंग

जास्त काळ चार्ज करू नका: जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन स्मार्टफोन वर्षानुवर्षे कोणत्याही व्यत्ययाशिवाय वापरायचा असेल तर सर्वप्रथम फोनला जास्त चार्ज करणे करणे बंद करावे लागेल. अनेक स्मार्टफोन वापरकर्त्यांना ही वाईट सवय असते की ते रात्री फोन चार्जींगवर ठेवून झोपतात. अशा स्थितीत फोन पूर्ण चार्ज केल्यानंतरही चार्ज होत राहतो. म्हणजे फोन ओव्हर चार्ज होतो. ज्याचा मोबाईलच्या बॅटरीवर वाईट परिणाम होतो. असे केल्याने तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर खराब होते. परिणामी स्मार्टफोन लवकर खराब होण्याच्या शक्यता देखील वाढतात.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here