ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon वर Great Republic Day Sale सुरू आहे. या सेलमध्ये स्मार्ट टीव्हीसह वेगवेगळ्या कॅटेगरीतील प्रोडक्ट्स बंपर डिस्काउंट आणि ऑफर्सचा फायदा मिळत आहे. तुम्ही जर कमी बजेटमध्ये नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. या सेलमध्ये २५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्हाला अनेक शानदार टीव्ही मिळतील. तुम्ही सेलमध्ये ४३ इंच स्क्रीन साइजसह येणारे OnePlus, Redmi, Mi, Amazon Basics, iFFALCON सारख्या कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. Amazon Sale मध्ये स्मार्ट टीव्हीवर डिस्काउंटचा फायदा मिळेलच. सोबतच एसबीआय बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. याशिवाय एक्सचेंज ऑफरचा देखील तुम्हाला फायदा मिळेल. सेलमध्ये स्वस्तात उपलब्ध या टीव्हींविषयी सविस्तर जाणून घेऊया.

iFFALCON (43 इंच) 4K अल्ट्रा HD 43U61 (2021 मॉडेल)

iffalcon-43-inches-4k-ultra-hd-43u61-2021-मॉडेल

iFFALCON 4K Ultra HD 43U61 (2021 Model) टीव्हीची किंमत २३,९९९ रुपये आहे. एसबीआय कार्डने पेमेंट केल्यास १,२५० रुपये अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल. टीव्हीत ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि ३८४०x२१६० पिक्सलसह येणारा डिस्प्ले दिला आहे. डिस्प्ले एचडीआर१० सपोर्ट करतो. हा अँड्राइड टीव्ही ९ पाय ओएसवर काम करतो. यात २४ वॉट ऑडिओ आउटपूट दिला आहे. तसेच, डॉल्बी सपोर्ट देखील मिळेल. यामध्ये ६४ बिट क्वाड कोर प्रोसेसर आणि २ जीबी रॅम + १६ जीबी स्टोरेज दिले आहे.

OnePlus Y मालिका (43 इंच) स्मार्ट टीव्ही

oneplus-y-series-43-inches-smart-tv

OnePlus Y Series (43 inches) Smart TV ची सेलमध्ये किंमत २५,९९९ रुपये आहे. एसबीआय कार्डने पेमेंट केल्यास यावर १,२५० रुपये अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल. हा टीव्ही अँड्राइड टीव्ही ९ पायवर काम करतो. याचा डिस्प्ले फुल एचडी रिझॉल्यूशन आणि ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो. यात गुगल असिस्टेंट, गुगल क्रोमकास्ट आणि गुगल प्ले स्टोरचा सपोर्ट दिला आहे. यात २० वॉट साउंड आउटपूटसह डॉल्बी एटमॉस ऑडिओ सपोर्ट दिला आहे. टीव्ही ६४-बिट प्रोसेसरस १ जीबी रॅमसोबत येतो.

Mi TV 4A 43-इंचाचा Horizon Edition TV (L43M6-EI)

mi-tv-4a-43-inch-horizon-edition-tv-l43m6-ei

Mi TV 4A 43 Horizon Edition टीव्ही सेलमध्ये फक्त २४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. या स्मार्ट टीव्हीवर एसबीआय कार्डने पेमेंट केल्यास अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. याशिवाय मोफत इंस्टॉलेशनची सुविधा मिळते. हा टीव्ही अँड्राइडवर काम करतो व यात स्टॉक अँड्राइड टीव्ही यूजर इंटरफेस आणि शाओमी Patchwall UI इंटरफेस मिळतो. यात फुल एचडी डिस्प्ले, क्वाड-कोर प्रोसेसर, १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज मिळते. हा अँड्राइड टीव्ही ८.० आधारित Patchwall वर काम करतो. यात २० वॉट साउंड आउटपूटचा सपोर्ट दिला आहे.

AmazonBasics (43 इंच) फायर टीव्ही AB43E10DS

amazonbasics-43-inches-fire-tv-ab43e10ds

AmazonBasics (43 inches) Fire TV AB43E10DS ला सेलमध्ये २२,७९९ रुपयात खरेदी करू शकता. तसेच, एसबीआय कार्डवर १,२५० रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल. यात ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. यामध्ये 2 HDMI पोर्ट, Blu-Ray प्लेअर्स, गेमिंग कन्सोल कनेक्टिव्हिटी सपोर्ट मिळतो. तसेच, २० वॉट साउंड आउटपूटसह डॉल्बी ऑडिओ आणि DTS Tru Surround साउंड सपोर्ट मिळतो. यात Alexa वॉइस सपोर्ट देखील दिला आहे.

Redmi (43 इंच) L43M6-RA (2021 मॉडेल)

redmi-43-inches-l43m6-ra-2021-मॉडेल

Redmi L43M6-RA (2021 Model) ला सेलमध्ये २२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. एसबीआय कार्डवर १,२५० रुपये अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल. रेडमीच्या या टीव्हीत ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह फुल एचडी डिस्प्ले मिळतो. यात २ एचडीएमआय आणि २ यूएसबी पोर्ट दिले आहेत. टीव्ही ब्लूटूथ ५.० सह येतो. यात २० वॉट साउंड आउटपूटसह Dolby Audio, DTS Virtual: X आणि DTS-HD फीचर सपोर्ट मिळतो. यात बिल्ट-इन क्रोमकास्ट आणि ड्यूल बँड वाय-फाय दिले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here