करोना काळात अनेक लोक घरून काम करत आहेत. तर, दुसरीकडे तर मुलांचे शिक्षण देखील ऑनलाइन सुरु आहे. अशा परिस्थितीत ऑफिसच्या अनेक Meetings या ऑनलाईन होत आहेत. आणि या दरम्यान प्रत्येकालाच कॅमेरासमोर चांगले आणि प्रोफेशनल दिसावे असे वाटते. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला फार काही करण्याची आवश्यकता नसून काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. कॅमेरा सेटअप करताना चांगला Background आणि चांगली प्रकाशयोजना याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात, अनेक लोकांनी मीटिंग दरम्यान Backgrounds आणि लाईट्सकडे फारसे लक्ष दिले नाही. पण, तुम्ही असे करू नका. Video Call वर असतांना नेमक्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे माहित असणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही व्हिडिओ कॉलवर अधिक चांगले आणि प्रोफेशनल दिसाल.

ऑडिओ तपासा

चेक-ऑडिओ

कॉल दरम्यान ऑडिओ देखील महत्वपूर्ण: व्हिडिओ मीटिंग दरम्यान तुमच्या ऑडिओचाही मोठा प्रभाव पडतो. खूप गोंधळ होत असेल अशा ठिकाणी जर तुम्ही बसला असाल तर मिटिंगमधील इतर लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून, शांतता आहे अशाच ठिकाणी सेटअप करा. तसेच, चांगल्या संवादासाठी चांगले हेडफोन वापरणे देखील आवश्यक आहे .अनेक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप्सवर माइक चाचणी साधने उपलब्ध आहेत. मीटिंग सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमचा आवाज तपासू शकता. तसेच, जेव्हा तुम्ही मीटिंगमध्ये बोलत नसाल तेव्हा तुमचा माइक म्यूट ठेवू शकता.

कॅमेरा चाचणी

कॅमेरा चाचणी

Video call सुरु होण्याआधी कॅमेरा टेस्ट करा: Online meeting दरम्यान हे अतिशय महत्वाचे आहे. मीटिंगमधील चांगल्या अनुभवासाठी, तुम्ही कॉल सुरू होण्यापूर्वी आवर्जून कॅमेरा टेस्ट करा. याच्या मदतीने तुम्ही कॉल करण्यापूर्वी सर्व आवश्यक ऍडजस्टमेंट करू शकाल आणि मीटिंग सुरु झाल्यानंतर कोणतीही समस्या येणार नाही. प्रिव्ह्यू व्हिडिओ फीचर वापरून तुम्ही स्वतःला कॅमेरामध्ये पाहू शकता. त्याच वेळी, कॉल सुरू झाल्यानंतर, तुम्ही तुमचा व्हिडिओ देखील हाईड करू शकता. यामुळे तुमचे लक्ष विचलित होणार नाही.

कॅमेरा स्तर

कॅमेरा पातळी

व्हिडिओ कॉल दरम्यान कॅमेरा तुमच्या डोळ्यांच्या लेव्हलवर ठेवा: अनेकदा टेबलची उंची चेहऱ्यापेक्षा कमी म्हणजेच खाली असते या परिस्थितीत, आपण काही पुस्तके, किंवा इतर काही वस्तूंची जमवा जमाव करून लेव्हल सेट करून उंची वाढवू शकता. जेव्हा कॅमेरा तुमच्या चेहऱ्याच्या खाली असतो, तेव्हा लोकांना तुमचा चेहरा प्रभावी वाटत नाही. कॉल सुरु झाल्यानंतर, फिजिकल मीटिंग दरम्यान लागू होणाऱ्या गोष्टी देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसेच प्रोफेशनल दिसण्याचा प्रयत्न करा.

प्रकाश सेटिंग्ज

प्रकाश सेटिंग्ज

लाईटकडे विशेष लक्ष द्या: Video Call दरम्यान लाइटिंगची पूर्ण काळजी घ्या. म्हणजे मीटिंग दरम्यान तुमच्या चेहऱ्यावर प्रकाश असावा, जेणेकरून दुसऱ्या बाजूला बसलेल्या लोकांचे लक्ष तुमच्याकडे जाईल. यासाठी तुम्हाला अशा ठिकाणी बसावे लागेल जिथून तुमच्या चेहऱ्यावर प्रकाश येईल. त्याच वेळी, प्रकाश तुमच्या मागच्या दिशेने तर नाही येत हे लक्षात ठेवा. असे झाले तर तुमचा चेहरा कॅमेऱ्यात चांगला दिसणार नाही. तुम्ही चष्मा लावत असाल तर कॉम्प्युटर स्क्रीनची ब्राइटनेस कमी ठेवा. म्हणजे, स्क्रीनचे प्रतिबिंब तुमच्या चष्म्यावर पडणार नाही.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here