व्हॉट्सअॅप स्टेट्सला भारतात प्रचंड मागणी आहे. अनेकांचे हे आवडते फीचर आहे. ज्याचा दिवसभरात सर्वात जास्त वापर केला जातो. व्हॉट्सअॅपने स्टेट्समध्ये बदल केल्याची माहीत WABtainfo ने दिली आहे. व्हॉट्सअॅप स्टेट्सवर आता केवळ १५ सेकंदाचा व्हिडिओ लावता येणार आहे. सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चरवरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी कंपनीने हे महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारतात व्हॉट्सअॅपचे जवळपास ४०० मिलियन अॅक्टिव युजर्स आहेत. भारतात या फीचर्सला सर्वात जास्त मागणी आहे.
जर जर कुणी ३० सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो आता होणार नाही. करोना व्हायरसला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिलच्या मध्यरात्री नंतर संपणार आहे. त्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांकडून सोशल मीडियावर व व्हॉट्सअॅपवरचा वापर वाढला आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times