स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर वाढल्याने आता बाजारात जाऊन खरेदी करण्याऐवजी थेट घरबसल्या कोणतीही वस्तू खरेदी करता येते. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग साइटवरून कपड्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह काहीही मागवू शकता. ऑनलाइन शॉपिंगचे तोटे असले तरीही याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे येथून खरेदी करताना मिळणारे डिस्काउंट. तुम्ही निम्म्या किंमतीत अनेक प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. याशिवाय अनेकदा कॅशबॅक ऑफरचा देखील फायदा मिळतो. आम्ही तुम्हाला अशाच काही कॅशबॅक अ‍ॅप्सबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हाला अतिरिक्त रिवॉर्ड मिळेल. शॉपिंग केल्यानंतर कॅशबॅक थेट बँक खात्यात जमा होईल. तसेच, या अ‍ॅप्सवरून डिस्काउंट वाउचर देखील मिळेल. ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टवर अनेकदा सेल सुरू असतो. या सेलमध्ये तुम्ही या अ‍ॅप्सचा वापर करून खरेदी केल्यास अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल. या अ‍ॅप्सविषयी जाणून घेऊया.

CashKaro

cashkaro

ऑनलाइन शॉपिंग करताना अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा हवा असल्यास CashKaro अ‍ॅप तुमच्या खूपच उपयोगी येईल. CashKaro ने अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बाजार, जेबाँग, मिंत्रासह अशा ५०० पेक्षा अधिक मर्चेंटसोबत भागीदारी केली आहे. या अ‍ॅपचा वापर केल्यास तुम्हाला ५ ते १० टक्के अतिरिक्त कॅशबॅकचा फायदा मिळेल. २५० रुपयांपेक्षा अधिक कॅशबॅक झाल्यावर तुम्ही थेट बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता. त्यामुळे शॉपिंग करताना या अ‍ॅपचा वापर केल्यास नक्कीच फायदा होईल.

CouponDunia

coupondunia

CouponDunia वर देखील आकर्षक ऑफर आणि डिस्काउंटचा फायदा मिळेल. CouponDunia ने फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, मेकमायट्रिप, पेटीएम, बुकमायशो आणि २००० पेक्षा अधिक ऑनलाइन ब्रँड्ससोबत भागीदारी केली आहे. CouponDunia च्या अ‍ॅप आणि वेबसाइटवरून तुम्ही २ ते १२ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता. एकावेळी तुम्ही २५० रुपयांपेक्षा अधिक कॅशबॅक झाल्यास बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता. याद्वारे तुम्ही मोबाइल रिचार्ज देखील करू शकता. तसेच, फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन वाउचर स्वरुपात रिडीम करता येईल.

GoPaisa

gopaisa

GoPaisa प्रोमो कोड, कूपन आणि कॅशबॅक ऑफरसाठी फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, जेबाँग, लेंसकार्ट, मेकमायट्रिप, टाटा क्लिक, यात्रासह १००० पेक्षा अधिक ऑनलाइन ब्रँड्ससोबत भागीदारी केली आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला २ ते १५ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक आणि डिस्काउंटचा फायदा मिळेल. कॅशबॅकचा वापर तुम्ही मोबाइल नंबर अथवा डीटीएच कनेक्शनचे रिचार्ज करण्यासाठी करू शकता. याशिवाय वीज, पाणी बिल इत्यादींसाठी देखील याचा वापर करता येईल. तुम्ही ही रक्कम बँक खात्यात देखील ट्रांसफर करू शकता.

Lafalafa

lafalafa

Lafalafa अ‍ॅप कूपन आणि कॅशबॅक एग्रीगेटर आहे. हे Amazon, Flipkart, Jabong, Paytm, Myntra, Firstcry सह ५०० पेक्षा अधिक साइट्ससाठी कूपन प्रदान करते. याद्वारे तुम्हाला ५० टक्क्यांपर्यंत कॅशबॅकचा फायदा मिळेल.

Zingoy

Zingoy हे Amazon, Flipkart, Myntra, Ajio, Croma, Pharmeasy सह १००० पेक्षा अधिक नोंदणीकृत साइटवरून खरेदीवर कॅशबॅक प्रदान करते. याद्वारे तुम्हाला २८.५ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅकचा फायदा मिळेल. रेफ्रलने साइन अप केल्यावर आणि खरेदी केल्यास पेबॅक देखील मिळते. याद्वारे २५० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. तसेच, कॅशबॅकचा वापर अन्य खरेदीसाठी देखील करता येईल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here