भारतीय बाजारात दर आठवड्याला नवीन स्मार्टफोन लाँच होण्याची रांग लागली आहे. भारतीय कंपन्यांपासून ते परदेशातील अनेक स्मार्टफोन निर्माता कंपन्या आपल्या हँडसेट्सला लाँच करत आहे. Realme ने देखील भारतीय बाजारात काही दिवसांपासूनच आपला नवीन स्मार्टफोन Realme 9i ला लाँच केले आहे. या फोनची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र, तुम्ही Realme 9i स्मार्टफोनला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी याच्या पर्यायी फोन्सविषयी जाणून घ्या. याच बजेटमध्ये तुम्हाला अनेक शानदार डिव्हाइस मिळतील. तुमचे बजेट १५ हजार असल्यास या किंमतीत तुम्हाला Poco M3 Pro, Realme Nazro 30, Redmi Note 10T आणि Samsung Galaxy M32 सारखे फोन्स खरेदी करू शकता. हे सर्व स्मार्टफोन्स प्रमुख ऑनलाइन साइट्सवर स्वस्तात उपलब्ध आहे. फोन्सच्या किंमत आणि स्पेसिपिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Realme 9i

realme-9i

Realme 9i स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे. तर फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह १६ मेगापिक्सल Sony IMX४७१ कॅमेरा सेंसर दिला आहे. यात ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले, ३३ वॉट फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते.

Poco M3 Pro

poco-m3-pro

Poco M3 Pro स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी मॉडेलची किंमत १५,९९९ रुपये आहे. पोकोच्या या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. तर पॉवरसाठी २२.५ वॉट फास्ट चार्ज सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी यात ४८ मेगापिक्सल मुख्य सेंसरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.

Realme Nazro 30

realme-nazro-30

Realme Nazro 30 स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. फोनच्या ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,४९९ रुपये, ६ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,४९९ रुपये आणि ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १५,४९९ रुपये आहे. Realme Nazro 30 फोनमध्ये ३० वॉट डार्ट चार्ज सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. तसेच, मीडियाटेक हीलियो जी९५ प्रोसेसरसह ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळतो.

Redmi Note 10T

redmi-note-10t

Redmi Note 10T स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आहे. तुम्ही जर १५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन फोन शोधत असाल तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. Redmi Note 10T मध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. यात डायमेंसिटी ७०० प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. तर फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सल मुख्य कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

Samsung Galaxy M32

samsung-galaxy-m32

Samsung Galaxy M32 स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपये आहे. तुम्ही जर सॅमसंगचा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर स्वस्तात येणारा गॅलेक्सी एम३२ एक चांगला पर्याय आहे. या फोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा सुपर एमोलेड डिस्प्ले दिला आहे. तर पॉवरसाठी ६००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सल मुख्य सेंसरसह क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

नोट – वरील सर्व स्मार्टफोन्सच्या किंमती ऑफर व शॉपिंग साइट्सनुसार वेगवेगळ्या असू शकतात.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here