बोटएअरडोप्स 281 प्रो

boAt Airdopes 281 Pro हे ६.५ तासांचा प्लेबॅक टाइम आणि चार्जिंग केससह अतिरिक्त २५ तासांचा बॅकअप प्रदान करतो. यामध्ये स्पष्ट आवाज यावा यासाठी ४ माईक्स आणि ENx mics चा सपोर्ट दिला आहे. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.१ चा सपोर्ट मिळतो. तसेच, याच टच सपोर्ट देखील दिला आहे. ASAP फास्ट चार्ज टेक्नोलॉजीद्वारे बड्स केवळ ५ मिनिटात ६० टक्के चार्ज होतात. या बड्सला तुम्ही १,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
नॉइज एअर कळ्या TWS

NOISE AIR BUDS TWS मध्ये टच सपोर्ट दिला असून, याद्वारे ट्रॅक चेंज करणे, कॉलिंग सारख्या सुविधा मिळतात. यूजर्स कोणत्याही समस्येशिवाय गाणी ऐकण्याचा आनंद घेऊ शकतात. यामध्ये १३ एमएम डायनॅमिक स्पीकर ड्रायव्हर दिले असून, याद्वारे डीप बास, क्रिस्प हाय आणि क्लिअर मिड्सचा आनंद मिळतो. सिंगल चार्जमध्ये बड्सला ४ तास वापरू शकता. चार्जिंग केससह २० तासांचा प्ले-टाइम मिळेल. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट दिला आहे. याची किंमत १,७९९ रुपये आहे.
टॅग लिबर्टी बड्स प्रो

TAGG Liberty Buds Pro ला तुम्ही फक्त १,१९९ रुपयात मॅट ब्लॅक आणि पियानो व्हाइट या रंगात खरेदी करू शकता. यामध्ये गेमिंगसाठी ४५ एमएस लेटेंसी मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.१ बॅकग्राउंड नॉइज कॅनेसिलेशनसह ४ माइक दिले आहेत. यामध्ये क्वाड-माइक, ३ इन-बिल्ट इक्वलाइजर सेटिंग्स, बासएक्स मोड आणि बॅलेस्ड माड, फास्ट चार्जिंग आणि आयपीएक्स५ रेटिंगसारखे फीचर्स मिळतात. बड्सला सिंगल चार्जमध्ये ६ तास वापरू शकता. चार्जिंग केससह याचा प्लेटाइम ३० तास आहे.
क्रॉसबेस्ट एअरपॉड्स

Crossbests Airpods चे वजन केवळ २ ग्रॅम असून, हा कॉम्पॅक्ट बिल्टसह येतो. गाणी ऐकण्याची आवड असणाऱ्या यूजर्ससाठी हे इयरबड्स परफेक्ट आहेत. यात बिल्ट-इन ऑडिओ ट्यूनिंगसह १० एमएमचे ड्रायव्हर दिले आहे. तसेच, सिंगल चार्जमध्ये या बड्सला तुम्ही ५ ते ६ तास वापरू शकता. यासोबतच, टाइप-सी फास्ट चार्जिंग केबलद्वारे केसला चार्ज करू शकता. Crossbests Airpods ला तुम्ही ऑनलाइन फक्त १,५९९ रुपयात खरेदी करू शकता.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times