AIWA ESBT 460 क्वाड ड्रायव्हर नेकबँड

AIWA ESBT 460 Quad Driver Neckband: किंमत – २९९९ रुपये, डिस्काउंट -४० टक्के
AIWA ESBT 460 क्वाड ड्रायव्हर या इयरफोन्समध्ये ८ mm क्वाड स्पीकर ड्रायव्हर टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. इयरफोन्स मायक्रो एसडी स्लॉटसह येतात, ज्यामुळे तुम्ही तुमचे आवडते संगीत सहज संग्रहित करू शकता. १० मीटरच्या ब्लूटूथ स्ट्रीमिंग रेंजसह, हा इअरफोन इनकमिंग फोन कॉल नोटिफिकेशन्ससाठी हायपर बास आणि हॅप्टिक व्हायब्रेशन देतो, नेव्हिगेशनसाठी सॉफ्ट मल्टीफंक्शन बटणे आणि वेगळ्या कीसह येतो. कमी किमतीत खरेदी करण्यासारखे हे एक चांगले डिव्हाइस आहे .
AIWA AT-X80E ट्रू वायरलेस स्टीरिओ इअरफोन्स

AIWA AT-X80E True Wireless Stereo Earphones : किंमत – १९९० रुपये, डिस्काउंट -४० टक्के
AIWA AT-X80E ट्रू वायरलेस स्टीरिओ इअरफोन्स इनबिल्ट माइक आणि एलईडी डिस्प्लेसह येतात. इयरफोन ब्लूटूथ ५.१ सह १० मीटरची ट्रान्समिशन रेंज देतात. AIWA AT-X80E ट्रू वायरलेस स्टीरिओ इयरफोन ६ तासांचा प्लेबॅक आणि ७० दिवसांचा स्टँडबाय टाइम देतात. त्याची चार्जिंग वेळ १.५ तास आहे. हे ब्लॅक आणि व्हाईट या दोन कलर व्हेरियंटमध्ये येते. बजेट युजर्ससाठी हा एक चांगला पर्याय आहे.
AIWA AT-X80FANC सक्रिय नॉईज इअरबड्स

AIWA AT-X80FANC Active Noise earbuds : किंमत – ७,९९९ रुपये, डिस्काउंट -४१ टक्के
नवीन AT-X80FANC इअरबड्स १२ तासांचा प्लेबॅक टाइम देतात. तसेच, AT-X80FANC इअरबड्स टाइप-सी चार्जिंग आणि १ तास फ्लॅश चार्जिंगसह येतात. याशिवाय, स्टायलिश TWS बड्स ब्लूटूथ आणि V ५.० सह येतात. या सर्व वैशिष्ट्यांसह, हा सर्वोत्तम True wireless स्पीकर आहे. हे लाइटवेट AT-X80FANC हाय-डेफिनिशन ऑडिओ गुणवत्तेने सुसज्ज आहे. हे डिव्हाइस काळ्या आणि पांढर्या अशा दोन रंगात इअरबड्स उपलब्ध आहेत.
AIWA SB-X350J पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर

किंमत – १२,९९० रुपये, डिस्काउंट २८ %
स्पीकर हे Qualcomm APT X HD (हाय-रिझोल्यूशन ऑडिओ) सह देखील येते, जे ब्लूटूथ ५. ० वर उत्कृष्ट २४ -बिट गुणवत्ता प्रदान करते. पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरमध्ये दोन निष्क्रिय बास रेडिएटर्स (समोर आणि मागे) आहेत. स्पीकर दोन Custom डिझाइन ४० mm सक्रिय ऑडिओ ड्रायव्हर्स आणि एक टाइप-सी चार्जिंग पॉइंटसह येतो. जो ३ तासांचा चार्जिंग वेळ आणि ५ तासांचा प्लेबॅक वेळ देतो.
AIWA SB-X350AP पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर:
किंमत – १५,९९० रुपये, डिस्काउंट – २० %
AIWA SB-X350APपोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरमध्ये सॉलिड अॅल्युमिनियम बिल्ट आणि हाय लक्स फिनिश आहे आणि हा क्लास रीडिंग सब-कॉम्पॅक्ट पोर्टेबल स्पीकर आहे. स्पीकरच्या समोर दोन बास रेडिएटर्स आहेत, ते टाइप-सी चार्जिंग आणि ४० W पॉवरसह येते.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times