​३९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे ३९९ रुपये सुरुवाती किंमतीत येणारा शानदार ब्रॉडबँड प्लान आहे. तुम्ही जर कमी किंमतीत वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन क्लासेससाठी प्लान शोधत असाल तर हा एक चांगला पर्याय आहे. BSNL च्या या ब्रॉडबँड प्लानमध्ये तुम्हाला एकूण २०० जीबी डेटा मिळेल. या प्लानमध्ये १० एमबीपीएसच्या स्पीडने डेटा मिळतो. याशिवाय मोफत लँडलाइन कनेक्शन देखील दिले जात आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. डेटा समाप्त झाल्यानंतर २ एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता.

​एअरटेलचा ४९९ रुपयांचा प्लान

खासगी टेलिकॉम कंपनी Airtel ग्राहकांना कमी किंमतीत शानदार ब्रॉडबँड प्लान्स ऑफर करत आहे. कंपनीकडे ४९९ रुपये सुरुवाती किंमतीत येणारा एंट्री लेव्हल ब्रॉडबँड प्लान आहे. Airtel च्या या प्लानमध्ये ३० दिवस म्हणजे संपूर्ण एक महिन्याची वैधता मिळते. या ब्रॉडबँड प्लानमध्ये ४० Mbps च्या स्पीडने तब्बल ३.३ टीबीपर्यंत अनलिमिटेड इंटरनेट दिले जात आहे. याशिवाय या प्लानमध्ये एअरटेल थँक्स बेनिफिट्ससह शॉ अकॅडेमी आणि विंग म्यूझिकचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

जिओचा ३९९ रुपयांचा प्लान

टेलिकॉम कंपनी Reliance Jio ला आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाइल प्लान्समुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. Jio कडे कमी किंमतीत फास्ट इंटरनेट स्पीडसह येणारे काही ब्रॉडबँड प्लान्स देखील उपलब्ध आहे. Reliance Jio कडे ३९९ रुपये सुरुवाती किंमतीत येणारा शानदार ब्रॉडबँड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये यूजर्सला ३० Mbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटाचा फायदा मिळत आहे. याशिवाय कॉलिंगचा देखील फायदा मिळतो. प्लानमध्ये कोणतेही ओटीटी बेनिफिट्स मात्र मिळत नाहीत.

​जिओचा ६९९ रुपयांचा प्लान

जिओच्या ६९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये १०० एमबीपीएसच्या स्पीडने अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळत आहे. या प्लानमध्ये कोणतेही ओटीटी सबस्क्रिप्शन मिळत नाही. मात्र, जास्त डेटा स्पीडसाठी तुम्ही हा प्लान निवडू शकता.

जिओचा ६९९ रुपयांचा प्लान

Jio कडे ९९९ रुपये किंमतीचा ब्रॉडबँड प्लान असून, यामध्ये १५० एमबीपीएसच्या स्पीडने अनलिमिटेड डेटा आणि मोफत कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. या प्लानसोबत तब्बल १६ ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. यामध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम, सोनी लिव्ह, डिज्नी+ हॉटस्टार, झी५ आणि अल्ट बालाजी सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here