ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर दर आठवड्याला ग्राहकांसाठी नवनवीन सेल सुरू असतात. ई-कॉमर्स साइट Flipkart ने काही दिवसांपूर्वीच बिग सेव्हिंग डे सेलचे आयोजन केले होते. या सेलमध्ये जर तुम्ही स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स खरेदी केले नसल्यास आता पुन्हा तुमच्याकडे संधी आहे. Flipkart वर इलेक्ट्रॉनिक सेल सुरू झाला आहे. २७ जानेवारीपासून सुरू झालेला हा सेल ३१ जानेवारी २०२२ पर्यंत चालेल. या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीसह इतर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सला खरेदी करू शकता. या प्रोडक्ट्सवर नो-कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर, फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड आणि मोबाइल प्रोटेक्शन प्लानची सुविधा मिळेल. याशिवाय Citi बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल. या सेलमध्ये तुम्ही iPhone SE, iPhone 12 Mini, Motorola Edge 20 Fusion 5G, Vivo V23 5G आणि Oppo Reno 6 5G स्मार्टफोनला खरेदी करू शकता.

iPhone SE

iphone-se

iPhone SE चे ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्ट सेलमध्ये २७,९९९ रुपयात विक्रीसाठी उपलब्ध आहे. सिटी बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के म्हणजेच जवळपास २,७९९ रुपयांपर्यंत डिस्काउंटचा लाभ मिळेल. म्हणजेच फोनला २५,२०० रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय फोनवर १५,८५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळेल. फोनमध्ये रियरला १२ मेगापिक्सल आणि फ्रंटला ७ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये A१३ Bionic चिपसेट सपोर्ट मिळतो. यात ४.७ इंच रेटिना डिस्प्ले मिळतो.

आयफोन 12 मिनी

iphone-12-mini

iPhone 12 Mini स्मार्टफोनला सेलमध्ये तुम्ही फक्त ४१,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनला सिटी बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास १० टक्के अतिरिक्त सूटचा फायदा मिळेल. याशिवाय १५,८५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळतो. फोनमध्ये १२ मेगापिक्सल ड्यूल रियर कॅमेरा आणि १२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो. iPhone 12 Mini मध्ये ५.४ इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आणि ए१४ बायोनिक चिपसेटचा सपोर्ट दिला आहे.

Motorola Edge 20 Fusion 5G

motorola-edge-20-fusion-5g

Motorola Edge 20 Fusion 5G स्मार्टफोनची किंमत २०,४९९ रुपये आहे. फोनला सिटी बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास १० टक्के अतिरिक्त सूट मिळेल. फोनला ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह येतो. यामध्ये १०८ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते.

Vivo V23 5G

vivo-v23-5g

Vivo V23 5G स्मार्टफोनची किंमत २७,९९० रुपये आहे. फोनला सिटी बँकेचे कार्ड वापरून खरेदी केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट, आयसीआयसीआय आणि एसबीआय बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास १० टक्के अतिरिक्त सूट मिळेल. सोबतच, १५,४५० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा ऑफरचा देखील फायदा मिळतो. फोनमध्ये ५० मेगापिक्सल आणि ८ मेगापिक्सल ड्यूल फ्रंट कॅमेरा सेटअप दिला आहे. तर रियरला ६४ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. यात मीडियाटेक डायमेंसिटी ९२० प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे.

Oppo Reno 6 5G

oppo-reno-6-5g

Oppo Reno 6 5G स्मार्टफोनला तुम्ही फक्त २९,९९० रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय फोनला ईएमआयवर देखील खरेदी करता येईल. या फोनला दरमहिना ४,९९९ रुपये देऊन ईएमआयवर खरेदी करू शकता. सोबतच, फोनवर १५,८५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळेल. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज दिले आहे. फ्रंटला सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. तर रियरला ६४ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here