सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. याशिवाय खूपच कमी दरात इंटरनेट उपलब्ध झाल्याने अनेक कामे स्मार्टफोनच्या माध्यमातून सहज शक्य होतात. कपडे खरेदी, जेवण मागवण्यापासून ते पैसे पाठवण्यापर्यंत अनेक कामे सहज फोनच्या माध्यमातून शक्य आहे. विशेष म्हणजे या सर्व कामांसाठी Mobile Apps देखील उपलब्ध आहे. तुम्ही या Apps च्या माध्यमातून अनेक कामे मिनिटात करू शकतात. हे अ‍ॅप्स लहान मुले, तरूण, महिला, पुरूष, वृद्ध अशांना वापरण्यास सोपे जातील अशाप्रकारे डिझाइन केलेले असते. खास महिलांसाठी देखील Google Play Store आणि Apple App Store वर विशेष अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर असे काही अ‍ॅप्स मोफत उपलब्ध आहेत, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. महिलांसाठी उपयोगी ठरतील अशाच टॉप-५ अ‍ॅप्सविषयी जाणून घेऊया.

​एक्सपेंस मॅनेजिंग अ‍ॅप्स

आपली अनेकदा तक्रार असते की पगार झाल्यानंतर पैसा कोठे खर्च झाला हे लक्षातच येत नाही. आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी पैसे खर्च करतो, मात्र ट्रॅक करत नाही. त्यामुळे महिन्याच्या शेवटी समस्या निर्माण होते. अशा स्थितीमध्ये आपला खर्च मॅनेज करणे आणि ट्रॅक करणे गरजेचे आहे. ऑनलाइन Monefy, Expense Manager, Money Manager आणि Spending Tracker सारखे अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्ही खर्च ट्रॅक करू शकता.

​कॅब/बाईक सर्व्हिस प्रोव्हाइडर अ‍ॅप्स

अनेक प्रवासादरम्यान वेळेवर सार्वजनिक बस व इतर वाहने उपलब्ध होत नाहीत. तसेच, रात्रीच्या वेळी देखील प्रवास करताना वाहतुकीची समस्या निर्माण होत असते. अशावेळेस कॅब/बाईक सर्व्हिस प्रोव्हाइडर अ‍ॅप्स तुमच्या उपयोगी येतील. Uber, Ola आणि Rapido सारखे अ‍ॅप्स फोनमध्ये असायलाच हवे. या अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्ही कोठेही असला तरी एका ठिकाणावरून सहज दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता. तुम्ही एखाद्या अनोळखी ठिकाणी असल्यास घरी जाण्यासाठी कोणतेच साधन उपलब्ध नसल्यास हे अ‍ॅप्स उपयोगी येतील.

​सेफ्टी अ‍ॅप्लिकेशन

वर्किंग वुमनला अनेकदा अनोळखी ठिकाणी काम करावे लागते. अनेकदा उशीरापर्यंत कामावर थांबावे लागते. अशा स्थितीत सुरक्षेची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही फोनमध्ये bSafe, My SafetyPin आणि Smart 24×7 सारखे अ‍ॅप्स मोबाइलमध्ये इंस्टॉल करू शकता. हे अ‍ॅप्स मोफत प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत.

मेंस्ट्रुअल ट्रॅकिंग अ‍ॅप्स

मेंस्ट्रुअल साइकल ट्रॅक करण्यासाठी वर्किंग वुमन Period Tracker, My Calendar आणि Flo सारखे अ‍ॅप्स फोनमध्ये डाउनलोड करू शकतात.

​लिस्टिंग, रिमाइंडिंग अ‍ॅप्स

महिलांना ऑफिसपासून घरातील अनेक गोष्टींवर एकाचवेळी लक्ष द्यावे लागत असते. ऑफिसमधील मिटिंग ते घरातील वेगवेगळी कामे करावी लागतात. अशा स्थितीत सर्वच कामे मॅनेज करणे थोडे अवघड होते. काही कामे राहून देखील जातात. अशी समस्या निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही कामांची यादी करू शकता. यासाठी तुम्हाला प्ले स्टोरवर उपलब्ध अ‍ॅप्स उपयोगी येतील. ऑनलाइन Daily Tasks, To-Do List आणि Reminders सारखे अ‍ॅप्स उपलब्ध असून, याद्वारे तुम्ही अ‍ॅक्टिव्हिटीज ट्रॅक करू शकता.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here