BSNL 149 Rs Plan

BSNLचा १४९ रुपयांचा प्लान : या प्लान मध्ये बजेट किमतीत चांगले फायदे मिळतात. BSNL च्या १४९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये दररोज ग्राहकांना १ GB डेटा प्रदान केला जातो. वैधतेसाठी, हा प्लान २८ दिवसांसाठी चालतो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाल्यास या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. एसएमएसबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये दररोज १०० एसएमएस मोफत उपलब्ध आहेत. एकूणच यात, कॉलिंग , डेटा आणि मेसेजेसचा लाभ मिळेल.
BSNL 139 Rs Plan

बीएसएनएलचा १३९ रुपयांचा प्लान : यामध्ये यूजर्सना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि रोजचा डेटा यांसारखे फायदे मिळतात. कमी किमतीत हा देखील एक चांगला प्लान आहे. बीएसएनएलच्या १३९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता उपलब्ध आहे. व्हॉईस कॉलिंगसाठी या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. डेटाबद्दल बोलायचे झाले तर बीएसएनएलच्या १३९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ GB डेटा दिला जातो. हा प्लान फक्त Inactive2 ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
BSNL 118 Rs Plan

बीएसएनएलचा ११८ रुपयांचा प्रीपेड प्लान : बीएसएनएलच्या ११८ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना दररोज ०.५ GB डेटा दिला जातो. या प्लानमध्ये एकूण ३६ GB डेटा बसतो. वैधतेबद्दल बोलायचे झाले तर, बीएसएनएलच्या ११८ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये २६ दिवसांपर्यंतची वैधता देण्यात आली आहे. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आले आहे. याशिवाय पीआरबीटीची मोफत सेवाही या योजनेत दिली जाते.
BSNL 97 Rs Plan

बीएसएनएलचा ९७ रुपयांचा प्रीपेड प्लान : BSNL च्या या ४ परवडणाऱ्या प्रीपेड प्लानची किंमत ९७ रुपयांपासून सुरू होते. बीएसएनएलच्या ९७ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना १८ दिवसांपर्यंत वैधता दिली जाते. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. डेटाबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये दररोज २ GB डेटा दिला जातो. बीएसएनएलच्या ९७ रुपयांचा प्रीपेड प्लान एकूण ३६ GB डेटा येतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times