अनेकजण नियमित घड्याळ खरेदी करण्याऐवजी सध्या स्मार्टवॉचला प्राधान्य देताना दिसत आहे. नियमित वॉचच्या तुलनेत स्मार्टवॉचची किंमत थोडी अधिक असली तरी यात मिळणारे फीचर्स दमदार आहेत. या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला कॉलिंग, हेल्थ, स्पोर्ट्स मोड आणि नॉटिफिकेशनसह अनेक शानदार फीचर्स मिळतील. या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला हार्ट रेट सेंसर, SpO2 ट्रॅकिंग, स्लीप ट्रॅकिंग आणि जीपीएस ट्रॅकर सारखे एकापेक्षा एक शानदार फीचर्स मिळतील. तुमचे बजेट जर १० हजार रुपयांपर्यंत असल्यास या किंमतीत अनेक शानदार स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. या किंमतीत तुम्ही Xiaomi Mi Watch Revolve Active, Realme Watch S Pro, Xiaomi Mi Watch Revolve, Huawei Watch Fit, Amazfit Pace Smartwatch, Noise ColorFit Ultra 2, Fire-Boltt Invincible, TIMEX Fit 2.0, Amazfit GTS 2 mini आणि Amazfit GTS 2e स्मार्टवॉचला खरेदी करू शकता.

Xiaomi Mi Watch Revolve Active

xiaomi-mi-watch-revolve-active

Xiaomi Mi Watch Revolve Active ची किंमत ९,९९९ रुपये आहे. यामध्ये १.३९ इंच एमोलेड डिस्प्ले दिला आहे. वॉच अँड्राइड आणि आयओएस सपोर्ट करते. वॉचमध्ये सिलिकॉन स्ट्रॅप मटेरियल दिले आहे.

Realme Watch S Pro

Realme Watch S Pro ची किंमत ९,९९९ रुपये आहे. यामध्ये ३३ एमएम डिस्प्ले दिला आहे. वॉच अँड्राइड आयओएस डिव्हाइसला सपोर्ट करते. यामध्ये देखील सिलिकॉन स्ट्रॅप मटेरियल दिले असून, वॉचला ब्लॅक, ब्लू, ऑरेंज आणि ग्रीन रंगात खरेदी करू शकता.

Xiaomi Mi Watch Revolve

xiaomi-mi-वॉच-रिव्हॉल

Xiaomi Mi Watch Revolve ला तुम्ही ९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या वॉचमध्ये ४६ एमएम एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याच्या डायलचा शेप राउंड आहे. वॉच आयओएस आणि अँड्राइड डिव्हाइस सपोर्ट करते. वॉच अस्ट्रेल ऑलिव्ह, कॉस्मिक डस्ट मेहरून, मिडनाइट ब्लॅक, नेपच्यून ब्लू आणि स्पेस ब्लॅक रंगात उपलब्ध आहे.

Huawei Watch Fit

Huawei Watch Fit ची किंमत ८,९९९ रुपये आहे. यामध्ये १.६४ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, वॉच अँड्राइड ५.० आणि iOS ९.० पुढील डिव्हाइसला सपोर्ट करते. यामध्ये हार्ट रेट सेंसर, SpO2 ट्रॅकिंग, स्लीप ट्रॅकिंग आणि जीपीएस ट्रॅकर सारखे फीचर्स दिले आहेत.

Amazfit Pace Smartwatch

amazfit-pace-smartwatch

Amazfit Pace Smartwatch ची किंमत ९,९९९ रुपये आहे. वॉचमध्ये ३४ एमएम एमोलेड डिस्प्ले दिला आहे. वॉच अँड्राइड आणि आयओएस दोन्ही ओएसला सपोर्ट करते. यात सिलिकॉन स्ट्रॅप मटेरियल दिले आहे. वॉचला ब्लॅक रंगात खरेदी करू शकता.

नॉइज कलरफिट अल्ट्रा २

Noise ColorFit Ultra 2 ला तुम्ही फक्त ५,४९९ रुपयात खरेदी करू शकता. या वॉचमध्ये १.७८ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचा डायल शेप रेक्टँगल्यूर आहे. वॉच अँड्राइड आणि आयओएस डिव्हाइसला सपोर्ट करते.

फायर-बोल्ट अजिंक्य

फायर-बोल्ट-अजिंक्य

Fire-Boltt Invincible स्मार्टवॉचची किंमत ६,९९९ रुपये असून, यात ३४ एमएम एमोलेड डिस्प्ले मिळतो. स्मार्टवॉचचा डायल शेप राउंड असून, यात सिलिकॉन स्ट्रॅप मटेरियल दिले आहे.

TIMEX फिट 2.0

TIMEX Fit 2.0 ची किंमत ५,६६५ रुपये आहे. या डिव्हाइसमध्ये ४५ एमएम एमोलेड डिस्प्ले दिला आहे. वॉच अँड्राइड आणि आयओएस दोन्ही डिव्हाइसला सपोर्ट करते. वॉचमध्ये सिलिकॉन स्ट्रॅप मटेरियल दिले असून, याचा डायल शेप राउंड आहे.

Amazfit GTS 2 मिनी

amazfit-gts-2-mini

Amazfit GTS 2 mini स्मार्टवॉच फक्त ५,९९९ रुपयात उपलब्ध आहे. यामध्ये ४५ एमएम एमोलेड डिस्प्ले दिला आहे. वॉचला मिडनाइड ब्लॅक, फ्लॅमिंगो पिंक आणि सेज ग्रीन रंगात खरेदी करू शकता. यात अनेक हेल्थ फीचर्सचा सपोर्ट दिला आहे.

Amazfit GTS 2e

दमदार फीचर्ससह येणाऱ्याAmazfit GTS 2e ची किंमत ९,९९९ रुपये आहे. यामध्ये ४२ एमएम एमोलेड डिस्प्ले दिला आहे. वॉच अँड्राइड आणि आयओएस दोन्ही डिव्हाइस सपोर्ट करते. याचा डायल शेप रॅक्टँगल आहे. वॉचला डॉलफन ग्रे, ऑब्सिडियन ब्लॅक आणि रोलँड पर्पल रंगात खरेदी करता येईल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here