केस खरेदी करा

फोन खाली पडल्यावर नुकसान होण्याची शक्यता सर्वाधिक असते. फोन कधीही खिश्यातून अथवा गाडी चालवतानाही पडू शकतो. यामुळे स्क्रीनचे आणि बॉडी पार्ट्सचे नुकसान होते. त्यामुळे तुमच्या फोनसाठी केस अथवा कव्हर खरेदी करणे हा एक चांगला उपाय आहे. केसमुळे तुमच्या फोनची स्क्रीन तर फुटणार नाहीच सोबतच, पाण्यापासून देखील बचाव होईल. याशिवाय धुळीपासून देखील फोनचा बचाव होईल. तुम्ही फोन मॉडेलनुसार बाजारात एक चांगला कव्हर खरेदी करू शकता.
स्क्रीन गार्ड स्क्रीन सुरक्षित ठेवतो

तुमच्या फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ केसच नाही तर स्क्रीन गार्ड देखील महत्त्वाचा आहे. छोट्या चुकीमुळे फोनचा डिस्प्ले खराब होऊ शकतो. तुम्ही स्क्रीन प्रोटेक्टरचा वापर करून डिस्प्ले सुरक्षित ठेवू शकता. तसेच, फोन पडल्यानंतरही स्क्रीनला काही होणार नाही.
अॅप्लिकेशन अपडेट करा
फोनमध्ये अनेक अॅप्स उपलब्ध असतात, ज्याचा वापर आपण वेगवेगळ्या कामासाठी करत असतो. अशा अॅप्सला नियमित अपडेट करणे गरजेचे आहे. अॅप्सला मॅलवेअर सारख्या धोक्यापासून वाचण्यासाठी अपडेट करणे गरजेचे आहे. तसेच, ज्या अॅप्सचा उपयोग करत नाही अशांना डिलीट करावे.
योग्य प्लॅटफॉर्मचा करा वापर

फोनमध्ये अॅप्स इंस्टॉल करण्यासाठी नेहमी ट्रस्टेड सोर्सेजचा वापर करावा. अँड्राइड फोनसाठी Google Play Store आणि iPhone साठी अॅपल अॅप स्टोर सारख्या अधिकृत अॅप स्टोरचा वापर करावा. इतर थर्ड पार्टी वेबसाइटवरून अॅप डाउनलोड केल्यास मॅलवेअरचा धोका निर्माण होतो. अनेकदा आपण चित्रपट अथवा सीरिज डाउनलोड करण्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करतो. मात्र, यामुळे तुमच्या फोनमध्ये व्हायरसचा शिरकाव होऊ शकतो. तसेच, इतर साइटवरून डाउनलोड केलेल्या अॅप्समुळे तुमचा खासगी डेटा देखील चोरी होऊ शकतो.
पाणी आणि जास्त ट्रेम्प्रेचरपासून बचाव

पाणी आणि जास्त टेम्प्रेचरमुळे तुमचा फोन खराब होऊ शकतो. कंपनीने फोन वॉटरप्रुफ असल्याचा दावा केला असला तरीही जास्त पाणी पडल्यास डिव्हाइस खराब होऊ शकतो. फोनवर पाण्याचे थेंब पडले तरीही फोनचे नुकसान होऊ शकते.
कॅशे क्लिअर करा-
फोनमध्ये अनेक अॅप्सचा वापर करत असतो, यामुळे कॅशे तयार होतात. या फाइल्सला वेळोवेळी डिलीट करणे गरजेचे आहे. यामुळे आयफोन अथवा अँड्राइड स्मार्टफोन व्यवस्थित काम करतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times