जर तुम्ही स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर, सध्या स्मार्टफोन मार्केटमध्ये अनेक जबरदस्त पर्याय उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला मार्केटमधील सर्वोत्तम स्मार्टफोनबद्दल सांगत आहोत. Samsung Galaxy M21 2021, Redmi Note 10S, Vivo Y73, Samsung Galaxy , Samsung Galaxy M52 5G, iQOO 7 5G, Samsung Galaxy M12, Mi 11X Pro 5G आणि iQOO Z3 5G हे भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम पर्याय आहेत. स्मार्टफोन खरेदी करतांना प्रत्येकाची आवड आणि गरजा वेगळ्या असू शकतात. काहींना कॅमेरा अधिक चांगला हवा असतो. तर काही लोक बॅटरी आणि प्रोसेसरकडे विशेष लक्ष देतात. शिवाय, फोन खरेदी करायचा तर सर्वात महत्वाचे असते ते बजेट. तुम्हीही एक जबरदस्त डिव्हाइस खरेदी करणार असाल तर ही लिस्ट नक्की पाहा. चला जाणून घेऊया या सर्व स्मार्टफोन्सबद्दल.

Samsung Galaxy M52 5G

samsung-galaxy-m52-5g

Samsung Galaxy M52 5G मध्ये ६.७० -इंच स्क्रीन आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०८०x२४०० पिक्सेल आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८जी प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज देण्यात आले आहे. ६४ मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा,१२ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याच्या ६GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये आहे.

Samsung Galaxy M12

samsung-galaxy-m12

फोनमध्ये ६.५० -इंचाची PLS IPS स्क्रीन आहे, ज्याचा ९० Hz चा रिफ्रेश दर आहे. हा स्मार्टफोन Octa core MediaTek Helio G35 वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डने१००० GB पर्यंत वाढवता येते. स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे, जी १५ W फास्ट चार्जने सपोर्ट करते. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित One UI Core वर काम करतो. त्याच्या ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ११,४९९ रुपये आहे.

Samsung Galaxy M21 2021

Samsung Galaxy M21 2021 मध्ये ६.४० -इंचाची सुपर AMOLED स्क्रीन आहे, स्मार्टफोनमध्ये Octa core Exynos 9611 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android ११ वर आधारित One UI ३.१ Core वर काम करतो. यात 4४जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आहे, त्याच्या ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १२, ९९९ रुपये आहे.

​iQOO Z3 5G

iqoo-z3-5g

या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७६८G प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. रियर कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनचा रियर कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे, ८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ६GB रॅम आणि १२८ GB इंटर्नल स्टोरेज आहे, जे microSD कार्डद्वारे १००० GB पर्यंत वाढवता येते. या स्मार्टफोनमध्ये ४४०० mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १९,९९० रुपये आहे.

Redmi Note 10S

स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G95 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा मागील कॅमेरा ६४ मेगापिक्सेल८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा,२ मेगापिक्सलचा तिसरा आणि २ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. चौथा कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.फोनच्या च्या ८GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १७,४९९ रुपये आहे.

Mi 11X Pro 5G

mi-11x-pro-5g

Mi 11X Pro 5G मध्ये १०८०x२४०० पिक्सेल रिझोल्यूशन आणि १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.६७-इंच सुपर AMOLED स्क्रीन आहे. हा स्मार्टफोन Octa core Qualcomm Snapdragon ८८८ वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये २० -मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.या स्मार्टफोनचा मागील कॅमेरा १०८ मेगापिक्सलचा आहे,८ मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे. फोनमध्ये ८GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज आहे. स्मार्टफोनमध्ये ४५२० mAh बॅटरी आहे, जी ३३ W फास्ट चार्जने सपोर्ट करते स्मार्टफोनच्या ८GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ३६,९९९ रुपये आहे.

​iQOO 7 5G

iqoo-7-5g

iQOO 7 5G मध्ये ६.६२ -इंच स्क्रीन आहे . या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १३ मेगापिक्सेलचा दुसरा आणि २ मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये ४४०० mAh बॅटरी आहे, जी ६६ W फास्ट चार्जिंगद्वारे समर्थित आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Funtouch ११.१ वर काम करतो. त्याच्या ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत २९,९९० रुपये आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here