Jio चा ४१९ रुपयांचा प्लान

Jio च्या ४१९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानची वैधता २८ दिवस असून, यामध्ये संपूर्ण कालावधीसाठी एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. हाय स्पीड डेटा समाप्त झाल्यानंतर इंटरनेट स्पीड ६४ केबीपीएस होईल. या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिला जात आहे. याशिवाय दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतात. प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
Jio चा ६०१ रुपयांचा प्लान

जिओच्या ६०१ रुपयांच्या प्लानमध्ये देखील दररोज ३ जीबी डेटा दिला जात आहे. या व्यतिरिक्त प्लानमध्ये अतिरिक्त ६ जीबी डेटा मिळेल. याप्रमाणे एकूण ९० जीबी डेटा मिळतो. हाय स्पीड डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. याशिवाय प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. तसेच, एक वर्षासाठी Disney+ Hotstar चे देखील सबस्क्रिप्शन मिळते. या प्लानची वैधता २८ दिवस आहे.
जिओचा १,१९९ रुपयांचा प्लान

जिओच्या १,१९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा यानुसार, एकूण २५२ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. डेली डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ केबीपीएसच्या स्पीडने नेट वापरू शकता. या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस दिले जात आहेत. प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य फायद्यांबद्दल सांगायचे तर यात JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
Jio चा ४,१९९ रुपयांचा प्लान

Jio च्या ४,१९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानची वैधता ३६५ दिवस असून, यात एकूण १,०९५ जीबी डेटा मिळतो. डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. याशिवाय प्लानमध्ये दररोज १०० मोफत एसएमएस मिळतात. अन्य फायद्यांबद्दल सांगायचे तर यात JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चा मोफत अॅक्सेस मिळतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times