Samsung Galaxy S22 मालिका

ही फ्लॅगशिप सीरिज ९ फेब्रुवारीला लाँच होणार असून, या अंतर्गत Galaxy S22, Galaxy S22 Plus आणि Galaxy S22 Ultra फोन्स लाँच होतील. या फोनमध्ये कंपनी गॅलेक्सी नोट सीरिजचे फीचर्स देऊ शकते. या सीरिजला एस-पेन सपोर्टसह Galaxy S22 ultra सोबत सादर केले जाऊ शकते.
OnePlus Nord CE 2
कंपनी Nord CE चा सक्सेसर म्हणून या फोनला ११ फेब्रुवारीला लाँच करू शकते. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फोन डायमेंसिटी ९०० प्रोसेसर आणि ६४ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येईल.
Realme 9 Pro आणि 9 Pro Plus

Realme 9i स्मार्टफोन लाँच झाला असून, रिपोर्टनुसार कंपनी लवकरच Realme 9 Pro आणि 9 Pro Plus ला लाँच करू शकते. दोन्ही फोन ५जी सपोर्टसह येतील. सीरिजच्या प्रो व्हेरिएंटची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा अधिक असेल. या फोनला १५ फेब्रुवारीला लाँच केले जाऊ शकते.
Oppo Reno 7 मालिका
कंपनीने या फोनला गेल्यावर्षी चीनच्या बाजारात लाँच केले आहे. आता ४ फेब्रुवारीला रेनो ७ आणि रेनो ७ प्रो भारतात लाँच होऊ शकतात. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि रियरला ५० मेगापिक्सल Sony IMX७६६ सेंसर मिळेल.
iQOO 9 मालिका

iQOO 9 सीरिज चीनमध्ये लाँच झाली आहे. या सीरिजला फेब्रुवारी महिन्यात भारतात सादर केले जाईल. या अंतर्गत iQOO 9 आणि iQOO 9 Pro या फोनला लाँच केले जाईल. iQOO 9 मध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर आणि प्रो व्हेरिएंटमध्ये स्नॅपड्रॅगन ८ झेन १ प्रोसेसर मिळेल.
Vivo X80 मालिका
विवो फेब्रुवारी महिन्यात Vivo X80 आणि Vivo X80 Pro या फोन्सला लाँच करू शकते. विवो एक्स८० मध्ये डायमेंसिटी ८००० प्रोसेसर, तर प्रो व्हेरिएंटमध्ये डायमेंसिटी ९००० चिपसेट मिळेल.
सॅमसंग गॅलेक्सी A13 5G

सॅमसंगने एंट्री लेव्हल Samsung Galaxy A13 5G स्मार्टफोनला अमेरिकेत लाँच केले होते. रिपोर्टनुसार हा फोन फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होईल. फोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा ६.५ इंच एलसीडी डिस्प्ले, ५० मेगापिक्सल कॅमेरा, डायमेंसिटी ७०० प्रोसेसर आणि ५००० एमएएचची बॅटरी मिळेल.
Samsung Galaxy A33 5G
फेब्रवारी महिन्यात Samsung Galaxy A33 5G स्मार्टफोन देखील लाँच होण्याची शक्यता आहे. फोनला BIS सर्टिफिकेशन साइटवर स्पॉट करण्यात आले आहे. फोनमध्ये ६.४ इंच FHD+ Super AMOLED स्क्रीन, ६ जीबी रॅम आणि ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. डिव्हाइस ब्लॅक, व्हाइट, लाइट ब्लू आणि ऑरेंज रंगात लाँच होऊ शकतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times