जगभरात गेल्या काही गोष्टीत सर्वच बाबतीत मोठे बदल झाले आहे. कमाई करण्याचे मार्ग देखील बदलले आहे. बिझनेसच्या भाषेत सांगायचे तर गुंतवणूक करण्याची पद्धत देखील बदलली आहे. यातीलच एक शब्द सध्या चर्चेत आहे तो म्हणजे NFT. एनएफटी मध्ये सध्या जगभरातील अनेक मोठेमोठ्या व्यक्ती रस दाखवत आहेत. यात अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खानसह अनेक क्रिकेटपटूंचा समावेश आहे. हे NFT नक्की काय आहे त्याविषयी जाणून घेऊया.

NFT चा अर्थ काय

NFT चा अर्थ होतो Non Fungible Token. ही एकप्रकारची डिजिटल संपत्ती आहे. याला ब्लॉकचेन टेक्नोलॉजीद्वारे हाताळले जाते. या टेक्नोलॉजीच्या मदतीने जीआयएफ, फोटो, व्हिडिओ क्लिप्स, पेटिंग व अन्य किंमत डिजिटल संपत्तीचा मालकी हक्क निश्चित होतो. या सर्व गोष्टी सध्या डिजिटल संपत्ती आहेत व याची खरेदी-विक्री देखील डिजिटल स्वरुपातच होते. थोडक्यात तुम्ही तुमच्या डिजिटल वस्तूंचा लिलाव करू शकता व याची खरेदी-विक्री क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून होईल.

​NFT मध्ये कशी होते खरेदी-विक्री?

nft-

एनएफटी म्हणजेच Non Fungible Token च्या मालकी हक्कासाठी एक Ownership सर्टिफिकेट मिळते. ज्या व्यक्तीची एखादी वस्तू, आर्ट, फोटो, व्हिडिओ इत्यादी या कॅटेगरीमध्ये येतात, त्यांच्या मालकीचे अधिकार सर्टिफिकेटद्वारे त्या व्यक्तीकडे जातात. ऑनलाइन गेमिंग, क्रिप्टो आर्टसाठी देखील एनएफटी टोकनचा वापर केला जात आहे.

एनएफटीसाठी केवळ डिजिटल हेच एक माध्यम आहे, हे Blockchain Technology वर काम करते. यामध्ये एकदा एंट्री झाल्यानंतर त्यात कोणतीही छेडछाड अथवा डिलीट करता येत नाही.

​NFT च्या माध्यमातून कशी होते कमाई?

nft-

गेमिंगद्वारे: यात डिजिटल गेमिंगद्वारे सर्वाधिक कमाईची शक्यता वर्तवली जात आहे. गेमिंग सेगमेंटमध्ये याला महत्त्वाचे मानले जात आहे. याद्वारे कमाई देखील करत आहे. समजा, तुमच्याकडे एक व्हर्च्यूअल रेस ट्रॅक आहे, तर दुसऱ्या प्लेअर्सला वापर करण्यासाठी दिल्यास तुम्हाला पैसे मिळतील.

गुंतवणूक: गुंतवणुकदारांना NFT वर कमाईसाठी जास्त वाट पाहावी लागू शकते. कारण बाजारात एका खास नाण्यांची मागणी आहे, मात्र विक्री करणारा यासाठी तयारच नाही. एखाद्या दुसऱ्या देशाचे महत्त्वाचे चिन्ह, म्यूझिममधील नाणी इतर व्यक्तींसाठी महत्त्वाची नसू शकतात. त्यामुळे गुंतवणुकदारांना कमाईसाठी वाट पाहावी लागू शकते.

​कसे काम करते ‘Blockchain Technology’?

-blockchain-technology

क्रिप्टोकरन्सी आणि एनएफटीसोबत गेल्या काही वर्षात ब्लॉकचेन टेक्नोलॉजी हे नाव देखील विशेष चर्चेत आहे. ब्लॉकचेन टेक्नोलॉजी हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, जेथे केवळ डिजिटल करन्सी नाही तर कोणत्याही वस्तूचा डिजिटल माध्यमात रेकॉर्ड ठेवला जाऊ शकतो. म्हणजेच, ब्लॉकचेन एक डिजिटल लेजर आहे. तर बिटक्वाइंन हे एक डिजिटल माध्यम आहे, ज्याद्वारे आपण काही वस्तूंची खरेदी व विक्री करू शकतो. एनएफटी हे ब्लॉकचेन टेक्नोलॉजीवरच काम करते.

​NFT चा इतिहास

nft-

Non Fungible Token अर्थात एनएफटीला सर्वात प्रथम मे २०१४ मध्ये Kevin McCoy आणि Anil Dash द्वारे तयार करण्यात आले आहे. हे Ethereum ब्लॉकचेन टेक्नोलॉजीवर काम करते. एखादे खास आर्ट, हटके फोटो-व्हिडिओ जे सर्वात वेगळे आहेत, ज्याचे मालकी हक्क एखाद्या खास व्यक्तीकडे आहेत, याच मालकी हक्काला Non Fungible Token म्हटले जाते. आज एनएफटीच्या माध्यमातून फोटो, जीआयएफ, व्हिडिओ, पेटिंग विकून लोक कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहेत.

​NFT चे भारतातील भविष्य

nft-

भारतातील एनएफटीच्या भविष्याबाबत वेगवेगळी मतं आहेत. कारण, ही खूपच नवीन संकल्पना आहे. ज्याप्रमाणे क्रिप्टोकरन्सीबाबत लोकांमध्ये संभ्रम होता. त्याच प्रमाणे सध्या एनएफटीबाबत आहे. तसेच, ऑनलाइन संपत्तीसाठी एवढे पैसे कसे खर्च करायचे, याबाबतही लोकांमध्ये गोंधळ आहे. भारतात एनएफटी लाँच करण्यासाठी ‘क्रिप्टो एक्सचेंज’ नावाची कंपनी ओळखली जाते. एका रिपोर्टनुसार, Ethereum ब्लॉकचेनमध्ये जारी एनएफटीचे एकूण मुल्य १४.३ बिलियन डॉलर आहे, जे गेल्यावर्षी जवळपास ३४० मिलियन डॉलर होते. सलमान खान, अमिताभ बच्चन, क्रिकेटपटू दिनेश कार्तिक हे देखील एनएफटी कलेक्शन आणण्याची शक्यता आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here