स्मार्टफोनचा वापर आपण सर्वचजण दिवसभर करत असतो. प्रत्येक कामासाठी स्मार्टफोन कामी येत असल्याने याचा वापर देखील वाढला आहे. त्यामुळे डिव्हाइसची बॅटरी जास्त क्षमतेची असणे गरजेचे आहे. अनेकदा आपण बाहेर असताना फोनची बॅटरी समाप्त झाल्यास मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे कमीत कमी दिवसभर टिकेल अशी बॅटरी असणारे फोन खरेदी करणे गरजेचे आहे. बाजारात ४००० एमएएच ते ६००० एमएएच बॅटरीसह येणारे फोन्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या फोन्सची किंमत देखील कमी आहे. तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात ६००० एमएएच बॅटरीसह येणारे काही स्वस्त फोन्स उपलब्ध आहेत. तुम्ही ६००० एमएएच बॅटरीसह येणारे कमी किंमतीतील Tecno, Gionee, Infinix, Realme, Moto, Lava चे फोन खरेदी करू शकता. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Tecno Spark 7

tecno-spark-7

या स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅमसह ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. यामध्ये ६.५ इंच डिस्प्ले, फोटोग्राफीसाठी १६ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत ९,९९० रुपये आहे.

Gionee Max Pro

फोनमध्ये ३ जीबी रॅमसह ३२ जीबी स्टोरेज मिळते. यात ६.५२ इंच डिस्प्ले, फोटोग्राफीसाठी ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ६००० एमएएच बॅटरीसह येणाऱ्या या फोनची किंमत ६,९९९ रुपये आहे.

Infinix Hot 10s

infinix-hot-10s

इनफिनिक्सच्या या फोनमध्ये ४ जीबी रॅमसह ६४ जीबी स्टोरेज मिळते. यात ६.८२ इंच डिस्प्ले, फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. पॉवरसाठी ६००० एमएएचची बॅटरी मिळेल. फ्लिपकार्टवर हा फोन ९,९९९९ रुपयात उपलब्ध आहे.

Realme Narzo 30A

या स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज मिळते. यामध्ये ६.५१ इंच डिस्प्ले, फोटोग्राफीसाठी ड्यूल रियर कॅमेरा सेटअप, पॉवरसाठी ६००० एमएएचची बॅटरी मिळतो. डिव्हाइसची किंमत ९,९९९ रुपये आहे.

Moto G10 Power

moto-g10-power

मोटोच्या या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. यात ६.५१ इंच डिस्प्ले दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. पॉवरसाठी ६००० एमएएचची बॅटरी मिळते. फ्लिपकार्टवरून या फोनला तुम्ही ९,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

Lava Z2 Max

डिव्हाइसमध्ये २ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज दिले आहे. यात ७ इंच डिस्प्ले, फोटोग्राफीसाठी ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ६००० एमएएच बॅटरीसह येणारा हा फोन फक्त ९,९९९ रुपयात उपलब्ध आहे.

Nokia C30

nokia-c30

या फोनमध्ये ३ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज, ६.८२ इंच डिस्प्ले, फोटोग्राफीसाठी ड्यूल रियर कॅमेरा, ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे. या फोनला फ्लिपकार्टवरून ९,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

Infinix Smart 5

इनफिनिक्सच्या या फोनची किंमत ७,४९९ रुपये आहे. यामध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळते. फोन ६.८२ इंच डिस्प्ले, ड्यूल रियर कॅमेरा सेटअप, पॉवरसाठी ६००० एमएएच बॅटरीसह येतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here