आता प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही असेल. फ्लिपकार्टवर सेल सुरू होणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्मार्ट टीव्हीवर प्रचंड सूट मिळेल. ग्राहक टीव्ही खरेदी करतांना मोठी बचत करू शकतील. Flipkart वर गुरुवारपासून बिग बचत धमाल सेल आयोजित करण्यात येत आहे. सेल दरम्यान स्मार्ट टीव्हीवर ७० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. Blaupunkt, Kodak आणि Thomson यासह लोकप्रिय ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीवर उत्तम डील्स या सेलमध्ये मिळतील. विशेष म्हणजे, टीव्ही फक्त ७,९९९ च्या सुरुवातीच्या किंमतीसह सेलमध्ये उपलब्ध असतील. याशिवाय ग्राहकांना बँक डिस्काउंट आणि नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही मिळेल. इतकेच नाही तर अनेक मॉडेल्सवर ११ हजारांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही मिळू शकतो. जर तुम्ही नवीन टीव्हीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी कमी किमतीत चांगला टीव्ही खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. ग्राहकांना ५ फेब्रुवारीपर्यंत या सेलचा लाभ घेता येईल .

सायबर साउंड (Blaupunkt 43 inch Cybersound)

-blaupunkt-43-inch-cybersound

ग्राहक २८,९९० रुपयांमध्ये ४३-इंचाचा अल्ट्रा-एचडी टीव्ही खरेदी करू शकतात. त्याची किंमत ३०,९९० रुपये आहे. टीव्हीमध्ये चार स्पीकर, बेझल-लेस डिझाइन आणि डॉल्बी डिजिटल प्लस आणि डीटीएस ट्रूसाऊंड प्रमाणित ऑडिओसह वैशिष्ट्ये द्वारे ५० W साउंड आउटपुट आहे. त्याचप्रमाणे, ५० -इंचाचा अल्ट्रा-एचडी टीव्ही सेल दरम्यान ३४,९९९ रुपयांना उपलब्ध असेल. त्याची किंमत साधारणपणे ३५,९९९ रुपये असते. टीव्ही Android 10 वर चालतो आणि त्यात ६० W स्पीकर आणि २ GB RAM समाविष्ट आहे.

​थॉमसन टीव्ही ( Thomson Smart TV)

-thomson-smart-tv

थॉमसन टीव्ही देखील फ्लिपकार्ट सेल दरम्यान सवलतीच्या किमतींसह उपलब्ध होतील, ज्याची सुरुवात अगदी १२,४९९ पासून होईल. टीव्ही रेंजमध्ये २४ ३२, ४०, ४३, ५०, ५५, ६५ आणि ७५ इंच मॉडेल्सचा समावेश आहे. सेल दरम्यान, थॉमसनचा २४ इंचाचा टीव्ही फक्त ८४९९ मध्ये उपलब्ध होईल, तर ३२-इंचाचा टीव्ही फक्त १२,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल, ज्याची किंमत १२,९९९ रुपये आहे. ७५ -इंचाचा टीव्ही कमाल ५,००० रुपयांच्या सवलतीत ९९,९९९ रुपयांमध्ये मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. ज्याची मूळ किंमत १,०४,९९ रुपये आहे. ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना Flipkart सेल दरम्यान निवडक टीव्ही मॉडेल्सवर अतिरिक्त १० टक्के सूट मिळेल.

​कोडॅक टीव्ही (Kodak 32 inch Tv)

-kodak-32-inch-tv

Flipkart सेलमध्ये, Kodak CA मालिका आणि 7XPro टीव्ही मॉडेल्सवरही सूट मिळेल. Kodak CA मालिका २४, ३२, ५५ आणि ६५-इंच पर्यायांमध्ये २५,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह उपलब्ध असेल. दुसरीकडे, Kodak 7X Pro सिरीजमध्ये ३२ इंच ते ५५इंच टीव्ही आहेत जे १२,४९९ ते ३३,९९९ रुपयांच्या किमतीच्या श्रेणीमध्ये सवलतीसह उपलब्ध असतील. परवडणारा २४-इंचाचा कोडॅक टीव्ही ७,९९९ रुपयांना उपलब्ध असेल.

Kodak CA मालिकेत 4K HDR10 डिस्प्ले, डॉल्बी डिजिटल प्लस ऑडिओ आणि DTS ट्रू सराउंड साउंड यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. दुसरीकडे, Kodak 7XPro मॉडेलमध्ये क्वाड-कोर प्रोसेसर, ५०० nits पर्यंत कमाल ब्राइटनेस आणि ३० W ध्वनी यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. टीव्हीमध्ये अॅमेझॉन प्राइम आणि यूट्यूबसह अनेक प्रीलोडेड अॅप्स देखील आहेत.

​सायबर साउंड ३२ इंच स्मार्ट टीव्ही(Blaupunkt Cybersound 32 inch smart tv)

-blaupunkt-cybersound-32-inch-smart-tv

सायबर साउंड ३२ इंच स्मार्ट टीव्ही (Blaupunkt Cybersound 32 icnh)

कमी किमतीत घरी टीव्ही खरेदी करायचा असल्यास स्मार्ट टीव्हीवरील सवलतीबद्दल बोलायचे झाल्यास, Blaupunkt Cybersound 32-इंच मॉडेलची किंमत १३,९९९ रुपये आहे. तो तुम्हाला Flipkart वर १३४९९ रुपयांना खरेदी करता येईल. हे HD-रेडी डिस्प्लेसह येते आणि त्यात ४० W ड्युअल स्पीकर्स समाविष्ट आहेत. ३२ -इंचाच्या मॉडेलशिवाय, या सेलमध्ये इतर Blaupunkt स्मार्ट टीव्हीवरही सूट मिळेल.

Blaupunkt Cybersound 42 inch smart tv: फुल-एचडी डिस्प्ले आणि ४० W स्पीकरसह Blaupunkt Cybersound ४२ इंच टीव्ही मॉडेल २०,९९९ रुपयांना उपलब्ध असेल. टीव्हीची किंमत साधारणपणे २१,९९९रुपये आहे.

सेलमध्ये Blaupunkt ५५ इंच आणि ६५ -इंच अल्ट्रा-HD टीव्ही मॉडेल्स ३९,९९९ आणि ५४,९९९ रुपयांना खरेदी करता येतील. या दोन्ही स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट सपोर्ट आणि क्वाड स्पीकर डिझाइन आहे. ५५-इंच टीव्हीची किंमत साधारणपणे ४०,९९९ रुपये असते तर ६५-इंच मॉडेलची किंमत ५५,९९९ रुपये असते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here