स्मार्टफोन मार्केट करिता फेब्रुवारी महिना खास ठरणार आहे. जर तुम्हला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यकडे अनेक पर्याय उपलब्ध असतील. Samsung, Oppo, Realme, Redmi, Nubia, Lenovo आणि बरेच काही यांसारख्या ब्रँड्सकडून या महिन्यात सुमारे १६ स्मार्टफोन लाँच होण्याची अपेक्षा आहे. सॅमसंगचा मोस्ट अवेटेड फ्लॅगशिप फोन Galaxy S22 देखील या यादीत समाविष्ट आहे. याशिवाय अनेक गेमिंग फोन्स देखील आहेत जे भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. तुमच्या सोयीसाठी, आम्ही फेब्रुवारी २०२२ मध्ये लाँच होणार्‍या फोनची लिस्ट तयार केली आहे. जी आम्ही आज तुमच्यासोबत शेयर करणार आहो. Oppo ने गेल्या वर्षी चीनमध्ये Reno 7 सीरीजचा फोन लाँच केला होता, मात्र आता तो भारतात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. अशाच काही भन्नाट आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सवर एक नजर टाकूया.

iQOO 9

iqoo-9

गेल्या महिन्यात iQOO ने चीनमध्ये iQOO 9 series लाँच केली होती आणि या महिन्यात भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे. iQOO ने स्वतः उघड केले आहे की, iQOO 9 आणि 9 Pro- लवकरच भारतात लाँच होईल. iQOO 8 चायनीज मॉडेल प्रत्यक्षात iQOO 9 असेल आणि iQOO 9 Pro चायनीज iQOO 9 असेल. सीरिजमध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले असेल. प्रो मध्ये QHD+ स्क्रीन असेल आणि व्हॅनिलामध्ये FHD+ डिस्प्ले असेल. iQOO 9 Pro मध्ये ५० MP+ ५० MP+१६ MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, भारतीय किंमतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Moto Edge 30 Pro

moto-edge-30-pro

मोटोरोला भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत एज एक्स 30 Edge Pro 30 Pro म्हणून आणू शकते. अद्याप लाँचची तारीख समोर आलेली नाही. एज 30 प्रो १४४ Hz रिफ्रेश रेटसह ६.७ इंच OLED FHD+ पॅनेलसह येण्याची अपेक्षा आहे. स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर उपलब्ध असेल. हा एक फ्लॅगशिप फोन असेल जो Snapdragon 8 Gen 1 चिपसेटद्वारे समर्थित असेल. यात १२ GB पर्यंत LPDDR5 RAM आणि २५६ GB पर्यंत UFS 3.1 इंटर्नल स्टोरेज असेल. डिव्हाइस ५००० mAh बॅटरी पॅक करेल आणि ६८ W जलद चार्जिंगला सपोर्ट करेल अशी अपेक्षा आहे. सध्या, त्याच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती नाही.

Samsung Galaxy S22

samsung-galaxy-s22

Samsung Galaxy S22

Samsung चा मोस्ट अवेटेड स्मार्टफोन Galaxy S22 या महिन्यात लाँच होऊ शकतो. सॅमसंगने अनपॅक्डसाठी लाँचची तारीख निश्चित केली आहे आणि हा कार्यक्रम ९ फेब्रुवारी रोजी होत आहे. S22 आणि S22+ मध्ये FHD+ डायनॅमिक AMOLED 2X पॅनल्स असतील. S22 आणि S22+ मध्ये १२ MP UW + ५० MP W + १० MP टेलिफोटो ट्रिपल रिअर कॅमेरे आहेत. मालिकेची सुरुवातीची किंमत सुमारे ६७००० रुपये असण्याची शक्यता आहे.

Realme 9 Pro

Realme 9 Pro आणि 9 Pro+ युरोपमध्ये १५ फेब्रुवारी रोजी लाँच होणार आहेत आणि १६ फेब्रुवारी रोजी भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे. 9 Pro मध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.५९ इंच FHD + AMOLED स्क्रीन असेल. भारतात Realme 9 Pro ची सुरुवातीची किंमत १५,००० रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

Vivo T1 5G

vivo-t1-5g

Vivo ने भारतात ९ फेब्रुवारी रोजी Vivo T1 5G लाँच करणार आहे. त्याचे काही स्पेसिफिकेशन नुकतेच समोर आले आहेत आणि असे म्हटले जात आहे की, ते चीनी आवृत्तीसारखे नसेल. भारतासाठी Vivo T1 5G स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेटसह येईल असे म्हटले जाते. चीनी आवृत्तीमध्ये स्नॅपड्रॅगन 778G आहे. फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स सध्या समोर आलेले नाहीत. परंतु, ते उच्च रिफ्रेश रेट स्क्रीन, मोठी बॅटरी आणि जलद चार्जिंग सपोर्टसह येऊ शकते. डिव्हाइसमध्ये सेगमेंट कॅमेरा सर्वोत्तम असण्याची अपेक्षा आहे. अलीकडील अहवालानुसार, फोनची किंमत २०,९९९ रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

Infinix Zero 5G

infinix-zero-5g

Infinix ८ फेब्रुवारी रोजी भारतात आपला Zero 5G स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज आहे. हा स्मार्टफोन डायमेंसिटी ९०० चिपसेटसह येईल आणि त्यात वेगवान LPDDR5 रॅम आणि UFS ३.१ इंटर्नल स्टोरेज असेल. स्मार्टफोन १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.६७-इंच FHD+ AMOLED स्क्रीनसह येण्याची अफवा आहे. फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आहे आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. त्याची किंमत सुमारे २०,००० रुपये असण्याची अपेक्षा आहे.

Redmi Note 11 आणि Note 11S

Xiaomi ९ फेब्रुवारी रोजी भारतात आपली Redmi 9 series अनावरण करेल. यात Note 11 आणि Note 11S हे दोन फोन समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे. आत्तापर्यंत, फोनचे कोणतेही स्पेसिफिकेशन लीक झाले नाहीत, Note 11 मध्ये ५० MP+८MP+२MP+२MP सेटअप असलेली क्वाड-कॅमेरा प्रणाली असेल, तर Note 11S मध्ये १०८ MP मुख्य लेन्स आणि समान सहाय्यक सेन्सर असण्याची अपेक्षा आहे.

Oppo Reno 7

oppo-reno-7

Reno7 Series भारतात ४ फेब्रुवारी रोजी लाँच होईल आणि त्यात Reno7 आणि Reno7 Pro 5G या दोन फोनचा समावेश असेल. हे Reno7 SE रीब्रँड केलेले असल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जात आहे की, ते ९० Hz रिफ्रेश रेटसह ६.४३ -इंच FHD+ AMOLED डिस्प्लेसह येईल. यात ४८MP+२MP+२ MP ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टीम आणि १६ MP सेल्फी स्नॅपर असण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, Reno7 Pro 5G मध्ये ६.५५-इंच 90Hz FHD+ AMOLED स्क्रीन असेल. हे ५०MP+८MP+२MP ट्रिपल कॅमेरे आणि ३२MP सेल्फी स्नॅपरसह येण्याची अपेक्षा आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here