आज स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकजण दिवसभर स्मार्टफोन वापरत असतात. अनेकांचा संपूर्ण दिवस चॅटिंग, कॉलिंग आणि सोशल मीडिया वापरण्यात जातो. मात्र, यासोबतच स्मार्टफोनचा वापर करून कमाई करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेकजण नोकरीतून मिळणाऱ्या पगारासोबतच कमाईचे इतर मार्गही शोधत असतात. योग्य मार्गाने अतिरिक्त कमाई करण्यासाठी जर तुम्ही इतर मार्ग शोधत असाल तर फक्त स्मार्टफोनच्या माध्यमातून हे शक्य आहे. आज स्मार्टफोनवर अनेक असे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यातून तुम्ही दिवसाला शेकडो रुपयांची कमाई करू शकता. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे व्हिडिओ प्लॅटफॉर्म युट्यूब आहे. युट्यूबवर वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ अपलोड करून अनेकजण मोठी कमाई करत आहे. गेल्या काही वर्षात युट्यूबच्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याशिवाय तुम्ही फोनवरून ब्लॉग लिहून देखील कमाई करू शकता.

​सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई

सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात स्टार झालेल्यांची संख्या कमी नाही. तुम्ही देखील सोशल मीडियावर सक्रिय असाल व तुमचे जास्त फॉलोअर्स असतील तर हे देखील कमाईचे एक माध्यम ठरू शकते. यासाठी तुम्हाला केवळ सातत्याने वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ, तसेच फोटो अपलोड करावे लागतील. शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्यांची संख्या मोठी आहे. तुमचे जर सोशल मीडियावर जास्त फॉलोअर्स असल्यास अनेक कंपन्या त्यांच्या प्रोडक्ट्सची जाहिरात करण्यासाठी तुम्हाला पैसे देतात.

फूड व्लॉग

चांगले चांगले पदार्थ खायला कोणाला आवडणार नाही. तसेच, कोणत्या ठिकाणी खास पदार्थ मिळतात, हे देखील लोकांना जाणून घ्यायचे असते. त्यामुळे सोशल मीडियावर food vlog ट्रेडिंगवर आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये त्या हॉटेल अथवा विशिष्ट पदार्थांविषयी माहिती देऊ शकता. तसेच, सोशल मीडियावर व्हिडिओ देखील पोस्ट करू शकता. तुम्ही जर क्वालिटी कंटेंट सादर केल्यास तुम्हाला प्रमोशन करण्यासाठी देखील पैसे मिळतील. याद्वारे लोक महिन्याला हजारो रुपयांची कमाई करत आहेत.

​ट्रॅव्हल ब्लॉग्स

नवनवीन ठिकाणी फिरायला आणि बाहेर जायला प्रत्येकाला आवडते. तुम्हाला देखील अशा गोष्टींची आवड असल्यास ट्रॅव्हल ब्लॉगच्या माध्यमातून मोठी कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ स्मार्टफोनच्या माध्यमातून पर्यटन ठिकाणांना भेट देऊन व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे. याशिवाय या ठिकाणांच्या वैशिष्ट्यांची लोकांना माहिती द्यायची आहे. सध्या ट्रॅव्हल ब्लॉगिंग ट्रेडिंगमध्ये आहे. प्रवासाचे व्हिडिओ अपलोड करून तुम्ही सोशल मीडिया फॉलोअर्स वाढवू शकता. यानंतर तुमची कमाई देखील सुरू होईल.

​युट्यूबच्या माध्यमातून कमाई

युट्यूबच्या माध्यमातून कमाई करण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तुम्ही युट्यूबवर वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ अपलोड करून कमाई करू शकता. तुमचे सबस्काइबर्स वाढल्यास जाहिराती आणि पेड प्रमोशनद्वारे हजारो रुपयांची कमाई होईल. याशिवाय तुम्ही कंटेंट रायटिंग, ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून देखील मोठी कमाई करू शकता. अनेक अ‍ॅप्स जाहिराती पाहिल्यावर, गेम्स खेळल्यानंतर देखील पैसे देतात. मात्र, या अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुमची जास्त कमाई होणार नाही.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here