सध्या सर्वत्र 5G ची चर्चा आणि क्रेझ पाहायला मिळत आहे. भारतात अद्याप 5G उपलब्ध नसेल तरी भारतीय स्मार्टफोन युजर्स देखील 5G स्मार्टफोनच्या खरेदीसाठी विशेष उत्सुक आहेत. तुम्ही देखील त्यापैकीच एक असाल आणि तुम्ही चांगला 5G स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी काही आश्चर्यकारक पर्याय घेऊन आलो आहोत. स्मार्टफोन खरेदीची याहून चांगली संधी तुम्हाला मिळणार नाही. ३ फेब्रुवारीपासून ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर बिग बचत धमाल सेल सुरू आहे. ज्यामध्ये सर्व वस्तूंवर सूट दिली जात आहे. यामध्ये स्मार्टफोन देखील आहे. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स मिळतील. काहींचा कॅमेरा तुम्हाला आवडेल तर काही फोनमध्ये देण्यात आलेली जबरदस्त बॅटरी तुम्हाला विशेष आकर्षित करेल. विशेष म्हणजे हे स्मार्टफोन्स सेलमध्ये तुम्ही अर्ध्या किमतीत खरेदी करू शकता.

Oppo F19 Pro+ 5G

oppo-f19-pro-5g

Oppo च्या या 5G फोनची बाजारात किंमत २९,९९० रुपये आहे. पण, Flipkart वरून Oppo F19 Pro+ 5G २५,९९० रुपयांना खरेदी करता येईल. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून, तुम्ही एक्सचेंज ऑफरसह १,३०० रुपयांचा चा कॅशबॅक आणि रु. १५,८५० पर्यंत बचत करू शकता. जर तुम्हाला या दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला तर तुम्ही २९,९९० रुपयांचा Oppo F19 Pro+ 5G फोन ८,८४० रुपयांना खरेदी करू शकता. Oppo F19 Pro+ 5G वर उपलब्ध ही बेस्ट डील आहे.

Realme 8 5G

realme-8-5g

हा १२८ GB 5G फोन तुम्ही १६,९९९ रुपयांऐवजी १६,४९९ रुपयांना खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा घेतल्यावर तुम्हाला १५,८५० रुपयांची सूट मिळेल. अशा प्रकारे तुम्ही Realme 8 5G फक्त ६४९ मध्ये खरेदी करू शकाल. फोन ड्युअल सिम (नॅनो) Realme 8 5G Android 11 वर Realme UI 2.0 काम करतो. यात ९० Hz रिफ्रेश रेट सोबत ६.५ इंचाचा फुल एचडी प्लसडिस्प्ले दिला आहे. याअंतर्गत एआरएम माली-जी 57 एमसी 2 जीपीयू आणि ८ जीबी पर्यंत एलपीडीडीआर ४ एक्स रॅम सोबत मीडियाटेक डाइमेंसिटी 700 एसओसी मिळते. स्मूद मल्टिटास्किंगासठी स्टोरेजला व्हर्च्यूअल रॅममध्ये बदलू शकते.

Samsung Galaxy F42 5G

samsung-galaxy-f42-5g

हा फोन २३,९९९ रुपयांऐवजी २०,९९९ रुपयांना विकण्यात येत आहे. तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात तो खरेदी केल्यास तुम्हाला १५,८५० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यावर, तुम्ही २३,९९९ रुपयांचा हा फोन ५,१४९ रुपयांना खरेदी करू शकाल. Samsung Galaxy F42 5G मध्ये ६.६० -इंचाचा TFT डिस्प्ले आहे. ज्याचे, रिफ्रेश रेट ९० Hz आणि आस्पेक्ट रेशो २०:९ आहे. स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा,५ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto G51 5G

moto-g51-5g

हा 5G फोन फ्लिपकार्टवरून १७,९९९ रुपयांऐवजी १४,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये संपूर्ण १४,३५० रुपये सूट मिळत असेल, तर या फोनची किंमत तुमच्यासाठी ६४९ रुपये असेल. Moto G51 स्मार्टफोनमध्ये ६.८ -इंचाचा फुल HD+ IPS डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर १२० Hz आहे. त्याचे रिझोल्यूशन १,०८०×२४०० पिक्सेल आहे. फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ४८० चिपसेट देण्यात आला आहे. याशिवाय, स्मार्टफोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल Moto G51 स्मार्टफोन ५००० mAh बॅटरीने सुसज्ज आहे.

Poco M3 Pro 5G

poco-m3-pro-5g

पोकोचा हा 5G फोन ६४ GB स्टोरेजसह येतो. Flipkart सेलमध्ये, १५,९९९ ऐवजी ९ % च्या सवलतीनंतर फोन १४,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. जर तुम्हाला या डीलमध्ये उपलब्ध एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला तर तुम्ही १३,९०० रुपये वाचवू शकाल आणि हा Poco फोन ५९९ रुपयांना खरेदी करू शकाल. पॉवरसाठी फोनमध्ये ५००० mAh ची दमदार बॅटरी मिळेल, जी १८वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येते. ड्यूल सिम सपोर्ट फोनमध्ये ३.५ एमएम ऑडिओ जॅक, एफएम रेडिओ सपोर्ट मिळेल. फोनला बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहे. ड्यूल ४G VoLTE, वाय-फाय ८०२.११ एसी, ब्लूटूथ ५.१, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी सारखे फीचर्स मिळतात.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here