व्हॅलेंटाइन डे जवळ आला असून, या निमित्ताने जर तुम्ही गर्लफ्रेंड अथवा बॉयफ्रेंडला नवीन स्मार्टफोन गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर बाजारात एकापेक्षा एक शानदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. Valentine’s Day च्या निमित्ताने तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीला चांगला स्मार्टफोन गिफ्ट देऊन हा दिवस साजरा करू शकता. बाजारात १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारे काही चांगले फोन्स उपलब्ध आहेत. आवडत्या व्यक्तीला गिफ्ट देण्यासाठी हे चांगले पर्याय आहेत. १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही Tecno Spark 8 Pro, realme narzo 50A,Redmi 9 Activ आणि OPPO A31 सारख्या स्मार्टफोन्सला खरेदी करू शकता. कमी किंमतीत येणाऱ्या या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला अनेक शानदार फीचर्स मिळतील. याशिवाय एक्सचेंज ऑफर आणि इंस्टंट कॅशबॅकचा देखील फायदा मिळेल. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Tecno Spark 8 Pro

tecno-spark-8-pro

Tecno Spark 8 Pro ची मूळ किंमत १३,४९९ रुपये आहे. मात्र, डिस्काउंटनंतर फक्त १०,९९९ रुपयात उपलब्ध आहे. हा फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह येतो. फोनला ब्लॅक आणि ब्लू रंगात खरेदी करू शकता. यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनमध्ये रियरला ४८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + एआय लेंस दिली आहे. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. फोनमध्ये ६.८ इंच फुल-एचडी+ डॉट-इन डिस्प्ले, ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G८५ SoC प्रोसेसर मिळते.

realme narzo 50A

realme-narzo-50a

कमी किंमतीत येणारा realme narzo 50A स्मार्टफोन गिफ्ट देण्यासाठी चांगला पर्याय आहे. या फोनमध्ये पॉवरसाठी ६००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी यात रियरला ५० मेगापिक्सल + २ मेगापिक्सल +२ मेगापिक्सलचा आणि सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. यात मीडियाटेक हीलियो जी८५ ऑक्टा-कोर प्रोसेसरसह ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळेल. याशिवाय ६.५ इंच एचडी डिस्प्ले मिळतो. फोनची किंमत १२,९९९ रुपये आहे, मात्र ११,४९९ रुपयात खरेदी करू शकता.

Redmi 9 Activ

redmi-9-activ

Redmi 9 Activ स्मार्टफोनची मूळ किंमत १०,९९९ रुपये आहे, मात्र, तुम्ही फक्त ९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनमध्ये रियरला १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलसह एआय पोर्ट्रेट मिळेल. तर फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर हीलियो प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. तसेच, ६.५३ इंच एचडी डिस्प्ले दिला आहे. पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. ड्यूल सिमसह येणाऱ्या या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळेल.

Nokia C20 Plus

nokia-c20-plus

Nokia C20 plus स्मार्टफोनची मूळ किंमत १०,४९९ रुपये आहे. मात्र, तुम्ही २४ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. नोकियाच्या या शानदार स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. यात ६.५ इंचाचा शानदार डिस्प्ले मिळतो. Nokia C20 plus मिळणाऱ्या स्टोरेजबद्दल सांगायचे तर फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल.

OPPO A31

oppo-a31

OPPO A31 च्या ६ जीबी मॉडेलची सुरुवाती किंमत १५,९९० रुपये आहे. मात्र, तुम्ही १९ टक्के डिस्काउंटनंतर १२,९९० रुपयात खरेदी करू शकता. तर ४ जीबी व्हेरिएंटला ११,४९० रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये रियरला १२ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल +२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ६.५ इंच डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन वॉटरड्रॉप मल्टी टच आहे. यात १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. यात ४२३० mAH lithium-polymer बॅटरी दिली आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here