तुम्ही जर स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल व तुमचे बजेट कमी असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या एका खास सेलमध्ये तुम्हाला स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर टीव्ही डेज सेल सुरू आहे. ६ जानेवारीपासून सुरू झालेला हा सेल १० फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, या सेल दरम्यान वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल. वेगवेगळ्या ब्रँड्सच्या टीव्हीला तुम्ही इंस्टंट डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, नो-कॉस्ट ईएमआय आणि संपूर्ण प्रोटेक्शनसह खरेदी करू शकता. या सेलमध्ये सॅमसंग, रियलमी, एआय सारख्या ब्रँड्सच्या ३२ इंच स्मार्ट टीव्हीला तुम्ही ७ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी नेऊ शकता. या टीव्हींमध्ये तुम्हाला दमदार फीचर्स मिळतील. सेलमध्ये उपलब्ध या स्मार्ट टीव्हींविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Realme NEO 80 cm (32 inch) HD Ready LED Smart TV (RMV2101)

realme-neo-80-cm-32-inch-hd-ready-led-smart-tv-rmv2101

रियलमीच्या या ३२ इंच स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत २१,९९९ रुपये आहे. परंतु, डिस्काउंटनंतर फक्त १३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट दिली जात आहे. टीव्हीला ४८६ रुपयांच्या ईएमआयवर देखील खरेदी करू शकता.तसेच, ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळतो. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास या टीव्हीला फक्त २,९९९ रुपयात खरेदी करता येईल. टीव्हीमध्ये ३२ इंच HD Ready LED डिस्प्ले, २० वॉट साउंड आउटपूट, ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह युट्यूबसह अनेक अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल.

​Realme 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV (TV 32)

realme-80-cm-32-inch-hd-ready-led-smart-android-tv-tv-32

या टीव्हीची मूळ किंमत १७,९९९ रुपये असून, ११ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तसेच, कोटक बँक क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट आणि ५५५ रुपयांच्या ईएमआयचा देखील पर्याय मिळतो. याशिवाय, टीव्हीवर ११ हजार रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा संपूर्ण लाभ मिळाल्यास टीव्हीला फक्त ४,९९९ रुपयात घरी नेऊ शकता. या टीव्हीत ३२ इंच HD Ready LED डिस्प्ले, बिल्ट इन क्रोमकॉस्ट आणि गुगल असिस्टेंट, २४W साउंड आउटपुट, ६०Hz रिफ्रेश रेट, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, यूट्यूब आणि डिज्नी प्लस हॉटस्टार सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो.

​Mi 4A PRO 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV

mi-4a-pro-80-cm-32-inch-hd-ready-led-smart-android-tv

एमआयच्या ३२ इंच दमदार स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत १९,९९९ रुपये आहे. परंतु, सेलमध्ये १७ टक्के डिस्काउंटनंतर १६,४९९ रुपयात खरेदी करू शकता. तसेच, कोटक बँक क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट मिळेल. याशिवाय ५७२ रुपयांच्या ईएमआयवर देखील टीव्ही खरेदी करू शकता. टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे. म्हणजेच, एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास हा टीव्ही फक्त ५,४९९ रुपयात तुमचा होईल. यामध्ये ३२ इंच HD Ready LED डिस्प्ले, २०W साउंड आउटपुट, ६०Hz रिफ्रेश रेट, गुगल असिस्टेंट आणि बिल्ट-इन क्रोमकास्ट, नेटफ्लिक्स, यूट्यूब, प्राइम व्हिडिओ आणि डिज्नी+ हॉटस्टार सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो.

​SAMSUNG 80 cm (32 inch) HD Ready LED Smart TV (UA32T4340AKXXL/UA32T4340BKXXL)

samsung-80-cm-32-inch-hd-ready-led-smart-tv-ua32t4340akxxl/ua32t4340bkxxl

या ३२ इंच स्मार्ट टीव्हीची किंमत २२,९०० रुपये आहे. परंतु, २५ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय कोटक बँक क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट मिळेल. टीव्हीला १,८८९ रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास हा टीव्ही फक्त ५,९९९ रुपयात तुमचा होईल. या टीव्हीमध्ये ३२ इंच HD Ready LED डिस्प्ले, २०W चा साउंड आउटपुट, ६० Hz रिफ्रेश रेट, नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि डिज्नी+हॉटस्टार सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल.

​SAMSUNG 80 cm (32 inch) HD Ready LED Smart TV with Voice Search (UA32TE40FAKBXL)

samsung-80-cm-32-inch-hd-ready-led-smart-tv-with-voice-search-ua32te40fakbxl

सॅमसंगच्या या टीव्हीची किंमत २०,९०० रुपये असून, सेलमध्ये फक्त १७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट आणि २ हजार रुपयांच्या ईएमआयवर देखील टीव्ही खरेदी करता येईल. तसेच, टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास हा टीव्ही फक्त ६,९९९ रुपयात घरी नेऊ शकता. सॅमसंगच्या या टीव्हीत ३२ इंच एचडी रेडी एलईडी डिस्प्ले, वॉइस सर्च सपोर्ट, २० वॉट साउंड आउटपूट, ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट व इतर अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here