आज स्मार्टफोनशिवाय कोणतेही काम करणे शक्य नाही. जेवण मागवण्यापासून ते ऑनलाइन शॉपिंगपर्यंत सर्व गोष्टी स्मार्टफोनच्या माध्यमातून शक्य होतात. चॅटिंग, कॉलिंगपासून ते सोशल मीडियासह दिवसभर आपण स्मार्टफोन वापरत असतो. मात्र, दिवसभर फोन वापरताना बॅटरी लवकर समाप्त झाल्यास मोठी समस्या निर्माण होते. सध्या बाजारात फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच, ६००० एमएएच बॅटरीसह येणारे फोन्स उपलब्ध आहेत. पॉवरफुल बॅटरीसह येणारे हे स्मार्टफोन बाजारात स्वस्तात उपलब्ध आहेत. फोन फास्ट चार्जिंग सपोर्ट टेक्नोलॉजीसह येणारे असले तरीही अनेकदा फोन लवकरच चार्ज होत नसल्याची समस्या जाणवत असते. तुमचा फोन देखील लवकर चार्ज होत नसल्यास त्यावरील मार्ग शोधणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमचा फोन फास्ट चार्ज होण्यास मदत होईल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​स्मार्टफोनचा चार्जर आणि केबल

स्मार्टफोनसोबत फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारे चार्ज उपलब्ध असतात. कंपन्या फोनसोबतच जास्त वॉटचा चार्जर बॉक्समध्ये देत असतात. मात्र, अनेकदा आपण दुसरा चार्जर वापरल्याने फोन खराब होण्याची शक्यता असते. तुमचा फोन देखील स्लो चार्ज होत असल्यास यामागे खराब चार्जर आणि केबल हे कारण असू शकते. केबल अनेकदा कट झाल्याने चार्जिंगची समस्या येत असते. चार्जरमधील समस्या व कनेक्टरवर धूळ बसल्याने देखील स्मार्टफोनची चार्जिंग स्लो होते.

​सॉफ्टवेअर नक्की करा अपडेट

अनेकदा पाहायला मिळते की, यूजर्स स्मार्टफोनमध्ये आलेल्या सॉफ्टवेअर अपडेटकडे दुर्लक्ष करतात. स्मार्टफोन अपडेट डाउनलोड न केल्याने फोन स्लो होण्याची शक्यता असते. तसेच, चार्ज होण्यासाठी देखील डिव्हाइस जास्त वेळ घेतो. स्मार्टफोनमधील सॉफ्टवेअर अपडेट न केल्यास डिव्हाइसमध्ये हीटिंगची देखील समस्या सुरू होते. अनेकदा कंपन्या फोनमधील बग्स फिक्स करण्यासाठी देखील अपडेट जारी करत असतात. त्यामुळे अशा सर्व समस्यांपासून सुटका हवी असल्यास सॉफ्टवेअर अपडेट नक्की करा.

​स्मार्टफोनची बॅटरी

स्मार्टफोनची बॅटरी जुनी असल्याने चार्जिंग स्पीड कमी झाल्याची देखील समस्या जाणवते. सध्या बाजारात येणारे बहुतांश फोन हे नॉन-रिमूव्हेबल बॅटरीसह येतात. त्यामुळे अशा बॅटरींना बदलणे शक्य नसते. मात्र, रिमूव्हेबल बॅटरी असल्यास त्याजागी तुम्ही नवीन ओरिजिनल बॅटरी टाकून ही समस्या सोडवू शकता. फोनची बॅटरी जुनी झाल्यास तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही. बाजारात ५ ते १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये पॉवरफुल बॅटरीसह येणारे अनेक चांगले फोन्स उपलब्ध आहेत.

​बॅकग्राउंड अ‍ॅप्स

बॅकग्राउंडमध्ये अ‍ॅक्टिव्ह अ‍ॅप्समुळे स्मार्टफोनची बॅटरी ड्रेन होण्यास सुरुवात होते. तसेच, फोनची रॅम देखील लवकर भरते व स्मार्टफोन स्लो काम करू लागतो. नेहमी स्मार्टफोनचा वापर करताना बॅकग्राउंडमधील अ‍ॅक्टिव्ह अ‍ॅप नक्की बंद करा. याशिवाय तुम्ही कंपनीने फोनसोबत दिलेल्या चार्जर व्यतिरिक्त इतर बनावट चार्जर वापरत असाल तर हे देखील डिव्हाइस स्लो चार्ज होण्याचे कारण असू शकते. त्यामुळे नेहमी फोनसोबत येणाऱ्या चार्जरनेच फोन चार्ज करावा.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here