नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आपल्या आणखी दोन प्लानमध्ये जबरदस्त डेटा ऑफर केली आहे. बीएसएनएलने आपल्या युजर्संना स्पेशल टॅरिफ व्हाऊचर अंतर्गत जास्त डेटा ऑफर केली आहे. बीएसएनएलने दोन प्लान आणले आहेत. पहिला ६९३ रुपयांचा आणि दुसरा १२१२ रुपयांचा प्लान आणला आहे. या दोन्ही प्लानमध्ये ३६५ दिवसांच्या वैधतेसह ५०० जीबी पर्यंत डेटा ऑफर दिला जात आहे.

६९३ आणि १२१२ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारे फायदे

बीएसएनएलने आपल्या युजर्ससाठी अनेक डेटा प्लान आणले आहेत. या दोन्ही प्लानमध्ये युजर्संना आणखी पर्याय मिळाले आहेत. जर या प्लानवर एक नजर टाकल्यास आपल्या लक्षात येते की, ६९३ रुपयांच्या प्लानमध्ये ३६५ दिवसांची वैधता आणि ३०० जीबी डेटा दिला जात आहे. तर १२१२ रुपयांच्या प्लानमध्ये ३६५ दिवसांची वैधता आणि तब्बल ५०० जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे, या दोन्ही प्लानमध्ये मिळणारा डेटा डेली लिमिटची मर्यादा नाही. या प्लामध्ये कॉलिंग किंवा एसएमएस मिळणार नाही. कंपनीने हे दोन्ही प्लान सध्या केवळ आंध्र प्रदेश आणि तेलंगाना या राज्यात सुरू केले आहे. बीएसएनएलच्या दुसऱ्या प्रसिद्ध एसटीव्ही वर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येते की, ५५१ रुपयांचा प्लान असून यात ९० दिवसांची वैधता आहे. या प्लानमध्ये रोज ५ जीबी या प्रमाणे एकूण ४५० जीबी डेटा दिला जातो.

प्रीपेड प्लानचे फायदे कमी झाले

बीएसएनएलने नुकतीच आपल्या प्लानमध्ये डेटा बेनिफिट्स आणि वैधता कमी केली आहे. कंपनीने आपला प्रसिद्ध १६९९ रुपयांचा वार्षिक प्लानची वैधता ३६५ दिवसांऐवजी केवळ ३०० दिवस केली आहे. तसेच १८६ रुपये आणि १८७ रुपयांच्या पॅकमध्ये ३जीबी डेटा कमी करून २ जीबी डेटा देण्यास सुरूवात केली आहे. ९८ रुपयांच्या प्लानमध्ये २४ दिवसांऐवजी २२ दिवसांची वैधता केली आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here