सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी BSNL आपल्या प्रीपेड प्लान्स सह Jio, Vodafone-Idea आणि Airtel यांना टक्कर देत आहे. BSNL चे असे प्लान आहेत, ज्यामध्ये तुम्हाला दररोज ५ जीबीपर्यंत डेटा मिळेल. या प्लान्समध्ये उपलब्ध असलेल्या बेनिफिट्समुळे बजेट युजर्ससाठी हे प्लान्स बेस्ट ठरू शकतात. सरकारी दूरसंचार कंपनी BSNL कडे आपल्या युजर्ससाठी परवडणाऱ्या BSNL प्रीपेड प्लानची संपूर्ण श्रेणी आहे. या सर्व प्रीपेड प्लानमध्ये यूजर्सना चांगले फायदे दिले जातात. अनेक कंपन्यांनी त्यांच्या प्लान्सच्या किमतीत वाढ केली, त्यानंतर बीएसएनएलचे सर्व प्लान्स इतर कंपन्यांच्या प्लानपेक्षा किफायतशीर ठरले. आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशाच काही जबरदस्त प्लान बद्दल सांगत आहोत. ज्यामध्ये बंपर डेटा व्यतिरिक्त, तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि अनेक अतिरिक्त फायदे देखील दिले जात आहेत. जाणून घ्या या प्लान्सबद्दल आणि खरेदी करा बेस्ट प्लान.

BSNL 499 Rs Plan

bsnl-499-rs-plan

BSNL चा ४९९ रुपयांचा प्लान: BSNL च्या ४९९ रुपयांच्या स्पेशल टेरिफ व्हाउचरमध्ये, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज २ GB डेटासह १०० मोफत एसएमएस दिले जात आहेत. या प्लानची वैधता ९० दिवसांची आहे. त्याच वेळी, जर तुम्हाला दररोज ५ जीबी डेटा हवा असेल तर तुम्हाला ५९९ रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज करावे लागेल. या प्लानमध्ये तुम्हाला रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अनलिमिटेड मोफत नाईट डेटा देखील मिळतो. प्लानमध्ये दररोज १०० मोफत एसएमएससह अनलिमिटेड कॉलिंग देखील दिले जात आहे.

BSNL 299,247 Rs Plan

bsnl-299247-rs-plan

बीएसएनएलचे २९९ रुपये आणि २४७ रुपयांचे प्लान्स: कंपनी २९९ रुपयांच्या प्लानमध्ये (STV_299) दररोज ३ GB डेटा देत आहे. या प्लानमध्ये, ३० दिवसांच्या वैधतेसह दररोज १०० मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग ऑफर करत आहे. त्याचप्रमाणे, २४७ रुपयांच्या STV मध्ये तुम्ही ५० GB डेटाचा लाभ यात घेऊ शकता. या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा तुम्हाला मिळेल. सोबतच, कंपनी १०० मोफत एसएमएस देखील यात ऑफर करत आहे. प्लानमध्ये तुम्ही Eros Now आणि BSNL Tune चे सबस्क्रिप्शन मिळवू शकता.

BSNL 187,347 Rs Plan

bsnl-187347-rs-plan

बीएसएनएलचा १८७ आणि ३४७ रुपयांचा प्लान: ग्राहकांना कंपनी १८७ रुपयांचा व्हॉईस प्लान देत आहे. Voice_187 असे या प्लानचे नाव आहे. यामध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा आणि १०० मोफत एसएमएससह २८ दिवसांची वैधता मिळेल. १८७ रुपयांच्या प्लानमध्ये, कंपनी देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग देखील देत आहे. तर, दुसरीकडे कंपनीच्या ३४७ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरमध्ये तुम्हाला दररोज २ GB डेटा देत आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचे बेनिफिट्स देखील तुम्हाला मिळेल. सोबतच, ५६ दिवसांच्या वैधतेसह दररोज १०० मेसेजेस देखील यात मोफत मिळतील.

BSNL 185, 298 Rs plan

bsnl-185-298-rs-plan

BSNL चा १८५ आणि २९८ रुपयांचा प्लान: तुम्हाला BSNL च्या १८५ रुपयांच्या प्लानमध्ये (STV_185) २८ दिवसांची वैधता मिळेल. तुम्ही जर डेटा युजर असाल तर या प्लानमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज १ GB डेटा देण्यात येत आहे .तसेच, दररोज १०० मोफत एसएमएस देखील तुम्हाला या प्लानमध्ये मिळतील. यामध्ये अनलिमिटेड कॉल्सचा लाभ मिळेल. तर, दुसरीकडे कंपनीचा २९८ रुपयांचा प्लान (STV_298) सुद्धा समान फायद्यांसह येतो. यात देखील तुम्हाला सर्व फायदे मिळतील. परंतु, २९८ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवस आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here