सध्याच्या काळात स्मार्टफोनचा वापर प्रचंड वाढला आहे. प्रत्येक छोटे मोठे काम करण्यासाठी स्मार्टफोनचा उपयोग होतो. आपण अगदी शॉपिंगपासून ते एखाद्याला पैसे पाठवण्यासाठी देखील फोन वापरतो. विशेष म्हणजे ही सर्व कामे करण्यासाठी खास अ‍ॅप्स देखील उपलब्ध आहेत. असेच काही सरकारी अ‍ॅप्स प्ले स्टोरवर मोफत उपलब्ध आहेत, जे प्रत्येक व्यक्तीच्या फोनमध्ये असायलाच हवे. या अ‍ॅप्सच्या मदतीने तुमची अनेक कामे सोपी होतील. या सरकारी अ‍ॅप्सबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. मात्र, दैनंदिन कामात याचा खूपच उपयोग होईल. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुम्हाला सरकारी योजनांसह वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देखील मिळेल. तुमच्या फोनमध्ये Aarogya Setu App, BHIM UPI App, Aaykar Setu App आणि ePathshala App असायलाच हवे. वेगवेगळ्या कामासाठी उपयोगी येणाऱ्या या अ‍ॅप्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Aarogya Setu App

aarogya-setu-app

करोना व्हायरस महामारीच्या काळात प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये Aarogya Setu App असायलाच हवे. COVID-19 महामारी दरम्यान, लोकांच्या मदतीसाठी भारत सरकारने आरोग्य सेतू अ‍ॅप लाँच केला होता. या App च्या माध्यमातून भारतीय नागरिकांना आरोग्य संबंधी महत्त्वाची माहिती मिळते. या अ‍ॅपद्वारे तुम्हाला करोना व्हायरसच्या धोक्याबाबत देखील अलर्ट मिळेल. हे अ‍ॅप प्ले स्टोरवर मोफत उपलब्ध आहे. Aarogya Setu App मध्ये वेगवेगळ्या भाषांचा देखील सपोर्ट दिला आहे.

BHIM UPI App

bhim-upi-app

गेल्याकाही वर्षात सरकार कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देत आहे. या App ची टॅगलाइन – मेकिंग इंडिया कॅशलेस आहे. यावरूनच या App चा उपयोग लक्षात येतो. हे एक डिजिटल वॉलेट आहे. या App चा वापर करून तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. मोबाइल अथवा बँक खात्याच्या माध्यमातून तुम्ही पैसे पाठवू शकता, रिसिव्ह करू शकता. BHIM UPI App च्या माध्यमातून तुम्ही काही मिनिटात आर्थिक व्यवहार पूर्ण करू शकता. या अ‍ॅपला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे सादर करण्यात आले आहे.

​Aaykar Setu App

aaykar-setu-app

आयकर विभागद्वारे नागरिकांच्या सुविधेसाठी Aaykar Setu App सादर करण्यात आले आहे. Aaykar Setu App च्या माध्यमातून तुम्हाला विभागाद्वारे दिल्या जाणाऱ्या संपूर्ण सुविधांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल. अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला टॅक्ससंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुम्हाला जर ऑनलाइन टॅक्स भरायचा असल्यास अथवा पॅन कार्डसाठी कसा अर्ज करायचा माहित नसल्यास हे App उपयोगी येईल. टॅक्ससंबंधी इतर माहिती देखील तुम्हाला या App च्या माध्यमातून मिळेल.

​ePathshala App

epathshala-app

आज स्मार्टफोनच्या माध्यमातून कोणतीही नवीन गोष्ट शिकणे सोपे झाले आहे. ePathshala App च्या माध्यमातून देखील तुम्ही कोठुनही नवीन गोष्टी शिकू शकता. या अ‍ॅपमध्ये तुमच्यासाठी पाठ्यपुस्तके आणि मासिके उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप मोबाइल फोन, टॅबलेट आणि लॅपटॉप सारख्या डिव्हाइसवर काम करते. टेक्स्ट हाइलाइट करणे आणि नोट बनवण्यासाठी देखील या अ‍ॅपमध्ये सुविधा दिली आहे. या अ‍ॅपला National Council of Educational Research and Training ने सादर केले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here