टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा(Two Factor Authentication )

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा: खात्याच्या सुरक्षिततेसाठी द्वि-घटक ईमेल प्रमाणीकरण वापरले पाहिजे. युजरला एसएमएसद्वारे एक-वेळचा पासवर्ड प्राप्त होतो. जो, कोणत्याही डिजिटल पेमेंट अॅप किंवा साइटवर लॉग इन करण्यासाठी आवश्यक असतो. पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका.
संशयास्पद ई-मेल किंवा लिंक उघडू नका: संशयास्पद Email Attachment किंवा लिंक उघडू नये. असे केल्यास सिस्टमवर हानिकारक मालवेअर लोड केले जातात. याव्यतिरिक्त, वापरकर्त्याने संशयास्पद वेब फॉर्मद्वारे त्याची वैयक्तिक माहिती देणे देखील टाळले पाहिजे. या इमेल्सना स्पॅम म्हणून रिपोर्ट करा आणि त्यांना तुमच्या मेलबॉक्समधून हटवा.
मजबूत पासवर्ड तयार करा(Strong password)

नेहमी मजबूत पासवर्ड तयार करा: PhonePe आणि Google Pay चा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या Apps च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार पूर्ण केले जातात. म्हणूनच, PhoneP आणि Google Pay युजर्ससारख्या UPI अॅप्ससाठी नेहमी मजबूत स्क्रीन लॉक आणि पेमेंट पिन सेट असावा. तसेच तो वेळोवेळी बदलत राहावा.असे केल्यास इतर कोणीही तुमचा स्क्रीन पासवर्ड क्रॅक करू शकणार नाही. UPI-आधारित व्यवहार करण्यासाठी UPI पत्ता, फोन नंबर, QR कोड आणि आभासी पेमेंट पत्ता (VPA, or yourname@yourbank) शेअर करणे आवश्यक आहे. याशिवाय, upi आधारित पेमेंटशी संबंधित कोणतीही माहिती शेअर करू नका.
योग्य QR कोड (QR Code)

योग्य QR कोड वापरा: QR कोड स्कॅन करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. QR कोड स्कॅन करताना, नेहमी तुम्ही योग्य QR कोड वापरत आहात का ते तपासा. कारण, पेमेंटसाठी वापरताना चुकीचा QR कोड वापरून हॅकर्स सहजपणे फसवणूक करू शकतात आणि काही मिनिटांत तुमचे अकाउंट रिकामे होऊ शकते.
सार्वजनिक वाय-फाय वापरू नका: डिजिटल व्यवहार करताना सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क वापरणे टाळा. यामुळे सायबर हल्ले, चोरी आणि इतर फसवणूक यासारख्या घटना टाळण्यास मदत होते. अशा परिस्थितीत, ऑनलाइन पेमेंट व्यवहारांसाठी नेहमीच योग्य वेबसाइट्सचा वापर केला पाहिजे.
युनिक पासवर्ड वापरा (Unique Password)

युनिक पासवर्ड वापरा: अनेक युजर्स पासवर्ड लक्षात राहावा म्हणून त्यांचे नाव, जन्मतारीख, कुटुंबियांचे नाव किंवा त्यांची जन्मतारीख पासवर्ड म्हणून वापरतात. पण, प्रत्यक्षात असे पासवर्ड हॅक करणे हॅकर्ससाठी अतिशय सोप्पे असते. म्हणून असे पासवर्ड वापरणे टाळावे. एखाद्या डिव्हाइसला सुरक्षित ठेवण्यासाठी युनिक पासवर्ड नेहमी वापरावा. प्रत्येक डिजिटल व्यवहारासाठी स्वतंत्र पासवर्ड तयार करावा. पासवर्डसाठी नाव, वाढदिवस आणि इतर तपशील वापरणे टाळा. पासवर्ड कधीही कोणाशीही शेअर करू नका. शिवाय, सायबर अटॅक्सपासून दूर राहायचे असल्यास ते नियमितपणे बदलणे देखील तेवढेच आवश्यक आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times