नवी दिल्लीः देशात १ एप्रिलपासून जीएसटीत वाढ करण्यात आल्यानंतर शाओमी, ओप्पो कंपनीने आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करीत असल्याची घोषणा केल्यानंतर आता आयफोनने सुद्धा आपल्या फोनमध्ये वाढ केली आहे. जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आल्यानंतर ११ प्रो मॅक्स ची किंमत आता १ लाख १७ हजार १०० रुपये झाली आहे. तर आयफोन ११ प्रो ची किंमत १ लाख ६ हजार ६०० रुपये झाली आहे.

आयफोन ११ प्रो मॅक्सची आधी किंमत १ लाख ११ हजार २०० रुपये होती. परंतु, जीएसटी वाढल्यानंतर या फोनची किंमत १ लाख १७ हजार १०० रुपये झाली आहे. ही किंमत ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची आहे. या फोनमध्ये ५ हजार ९०० रुपयाने वाढ झाली आहे. तर आयफोन ११ प्रोच्या किंमतीत ५ हजार ४०० रुपयांची वाढ झाली आहे.

iPhone 11 Pro Max 64GB
१,११,२०० रुपये (आधी) १,१७,१०० रुपये (आता)

iPhone 11 Pro 64GB
१,०१,२०० रुपये (आधी) १,०६,६०० रुपये (आता)

iPhone 11 64GB
६४,९०० रुपये (आधी) ६८,३०० रुपये (आता)

iPhone XR 64GB
४९,९०० रुपये (आधी) ५२,५०० रुपये (आता)

iPhone 7 32GB
२९,९०० रुपये (आधी) ३१,५०० रुपये (आता)

मोबाइलची लाँचिंग भारतात बंद असली तरी चीनच्या काही मोबाइल कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करीत असल्याची घोषणा केली आहे. ओप्पो कंपनीनंतर चीनची आणखी एक स्मार्टफोन कंपनी शाओमीने (Xiaomi) आपल्या एमआय आणि रेडमी सीरिजच्या सर्व स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ करीत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शाओमीचे रेडमी सीरिजचे फोन आणि एमआयचे फोन आता महाग झाले आहेत. भारतात मोबाइलवर लावण्यात येत असलेल्या जीएसटीच्या दरात नुकतीच वाढ करण्यात आली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वीच मोबाइलवरील जीएटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के केला होता. त्यामुळे मोबाइल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here