टेलिकॉम कंपन्यांनी केलेली मागणी जर ट्रायने मान्य केली तर काही दिवसात युजर्संना रिचार्जसाठी ६० ते ८० टक्के रक्कम जास्तीची मोजावी लागणार आहे. जिओकडून मोबाइल डेटासाठी २० रुपये प्रति जीबी डेटा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर व्होडाफोनने एका जीबीसाठी ३५ रुपये किंमत करण्याची मागणी केली आहे. सध्या डेटा टॅरिफचे दर हे एका जीबीसाठी ४ रुपये आहे. जर ट्रायने टेलिकॉम कंपन्याची मागणी मान्य केली तर पोस्टपेड आणि प्रीपेड युजर्संना एका जीबीसाठी किंवा १.५ जीबीसाठी जवळपास ६० ते ८० टक्के जास्त रक्कम द्यावी लागेल.
जर ट्रायच्या आदेशानंतर ८० टक्के वाढ झाली तर एअरटेलच्या २१९ रुपयांच्या प्लानसाठी युजर्संना ३९४ रुपये मोजावे लागतील. म्हणजेच ग्राहकांना या प्लानसाठी १७५ रुपये जास्तीचे मोजावे लागतील. या प्लानमध्ये युजर्संना प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अन्य कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच या प्लानची वैधता २८ दिवस इतकी आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times