देशात १ एप्रिलपासून जीएसटीत वाढ करण्यात आल्यानंतर शाओमी, ओप्पो कंपनीने आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करीत असल्याची घोषणा केल्यानंतर आता आयफोनने सुद्धा आपल्या फोनमध्ये वाढ केली आहे. जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आल्यानंतर
११ प्रो मॅक्स
ची किंमत आता १ लाख १७ हजार १०० रुपये झाली आहे. तर आयफोन ११ प्रो ची किंमत १ लाख ६ हजार ६०० रुपये झाली आहे.
ओप्पो कंपनीनंतर चीनची आणखी एक स्मार्टफोन कंपनी शाओमीने (Xiaomi) आपल्या एमआय आणि रेडमी सीरिजच्या सर्व स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ करीत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शाओमीचे रेडमी सीरिजचे फोन आणि एमआयचे फोन आता महाग होणार आहेत. भारतात मोबाइलवर लावण्यात येत असलेल्या जीएसटीच्या दरात नुकतीच वाढ करण्यात आली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वीच मोबाइलवरील जीएटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के केला होता.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times