सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल ही खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी व आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक शानदार प्लान्स आणत असते. गेल्यावर्षी खासगी टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडियाने प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवत ग्राहकांना मोठा झटका दिला होता. बीएसएनएल ही एकमेव प्रमुख टेलिकॉम कंपनी आहे, जिने आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत वाढ केलेली नाही. BSNL कडे एकापेक्षा एक स्वस्त प्लान्स उपलब्ध आहेत व यात मिळणारे बेनिफिट्स देखील जबरदस्त आहेत. BSNL च्या स्वस्त प्लान्समध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, मोफत एसएमएस, डेटासह ओटीटी बेनिफिट्सचा देखील फायदा मिळेल. तुम्ही जर स्वस्त रिचार्ज प्लान्स शोधत असाल तर हे प्लान्स तुमच्या फायद्याचे ठरू शकतात. कंपनीच्या प्लान्सची सुरुवाती किंमत फक्त ११८ रुपये आहे. या प्लान्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सविषयी जाणून घेऊया.

​BSNL चा ११८ रुपयांचा प्लान

bsnl-

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे फक्त ११८ रुपये किंमतीत येणारा शानदार प्लान आहे. ११८ रुपयांच्या या प्लानची वैधता २६ दिवस आहे. यूजर्सला प्लानमध्ये २६ दिवस देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. तसेच, दररोज ०.५ जीबी डेटाचा देखील फायदा मिळेल.

BSNL चा १४७ रुपयांचा प्लान

BSNL च्या १४७ रुपयांच्या प्लानची वैधता ३० दिवस आहे. प्लानमध्ये यूजर्सला ३० दिवसांसाठी देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटडे कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, एकूण १० जीबी डेटा मिळेल. यात बीएसएनएल ट्यून्सचा देखील अ‍ॅक्सेस मिळतो.

​BSNL चा १८५ रुपयांचा प्लान

bsnl-

BSNL च्या १८५ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. यामध्ये यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, दररोज १ जीबी डेटा दिला जात आहे. तसेच, बीएसएनएल ट्यून्सचा देखील अ‍ॅक्सेस मिळतो.

BSNL चा १८७ रुपयांचा प्लान

या प्लानमध्ये कंपनी २८ दिवसांची वैधता देत आहे. याशिवाय या स्वस्त प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, दररोज १०० एसएमएस आणि दररोज २ जीबी डेटाचा देखील फायदा मिळतो.

​BSNL चा २४७ रुपयांचा प्लान

bsnl-

BSNL कडे २४७ रुपयांच्या किंमतीत येणारा स्वस्त प्लान उपलब्ध असून, याची वैधता ३० दिवस आहे. या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड वॉइस कॉलिंग सोबतच दररोज १०० एसएमएस आणि ३० दिवसांसाठी एकूण ५० जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय ग्राहकांना BSNL Tunes आणि EROS चा देखील अ‍ॅक्सेस मिळेल

BSNL चा Data_WFH १५१ रुपयांचा पॅक

बीएसएनएलच्या १५१ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस असून, या प्लानमध्ये संपूर्ण वैधतेसाठी एकूण ४० जीबी डेटा मिळतो. याशिवाय Zing चा मोफत अ‍ॅक्सेस देखील दिला जात आहे.

​BSNL चा १९८ रुपयांचा प्लान

bsnl-

बीएसएनएलच्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये ५० दिवसांची वैधता दिली जात असून, यामध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच, पूर्ण वैधतेसाठी एकूण १०० जीबी डेटा मिळेल. या प्लानचा दररोजचा खर्च ४ रुपयांपेक्षा कमी आहे.

BSNL चा Data_WFH २५१ रुपयांचा पॅक

कंपनीच्या २५१ रुपयांच्या या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता दिली जात असून, यामध्ये एकूण ७० जीबी डेटा आणि Zing चा अ‍ॅक्सेस मिळेल.

​BSNL चा २९८ रुपयांचा प्लान

bsnl-

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे २९८ रुपयांच्या किंमतीसह येणारा शानदार प्लान उपलब्ध आहे. २९८ रुपयांच्या या प्लानची वैधता ५६ दिवस असून, यामध्ये यूजर्सला देसभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळत आहे. याशिवाय दररोज १०० मोफत एसएमएस मिळतात. या स्वस्त प्लानमध्ये यूजर्सला दररोज १ जीबी डेटा यानुसार एकूण ५६ जीबी डेटाचा लाभ मिळेल. याशिवाय प्लानमध्ये EROS नाउ एंटरटेनमेंट सर्व्हिसचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here