आजकाल प्रत्येकजण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करत आहे. असा कोणताही स्मार्टफोन यूजर नसेल, ज्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाउंट नाही. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्म्सचा वापर लोक आपले अनुभव शेअर करण्यासाठी करतात. याशिवाय फोटो, व्हिडिओ देखील आपण सोशल मीडियावर शेअर करत असतो. सोशल मीडिया हे एखाद्या विषयावर आपले मत मांडण्याचे देखील प्रमुख माध्यम आहे. याशिवाय या प्लॅटफॉर्मवर अनेक मित्र-मैत्रिणी देखील बनतात. परंतु, आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर हा फोटो, व्हिडिओ शेअर करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. सोशल मीडिया हे कमाईचे देखील मोठे माध्यम आहे. तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत असाल, तर याद्वारे तुम्ही मोठी कमाई करू शकता. यासाठी तुमचे इंस्टाग्रामवर जास्त फॉलोअर्स असणे गरजेचे आहे. तुम्ही इंस्टाग्रामवरून कशी कमाई करू शकता, याविषयी जाणून घेऊया.

​इंस्टाग्राम शॉपिंग पेजच्या माध्यमातून होईल कमाई

इंस्टाग्राम हे सध्या केवळ फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म राहिलेले नाही. कंपनीने प्रोडक्ट सेलिंगसाठी देखील अनेक फीचर्स अ‍ॅपमध्ये उपलब्ध केले आहे. यासाठी इंस्टाग्राम हँडलवर एक पेज उघडून ई-कॉमर्स स्टोर सुरू करावे लागेल. येथे तुम्हाला प्रोडक्ट्सची लिंक द्यावी लागेल. तसेच ऑफर्सबाबत माहिती द्यावी लागेल. जर एखाद्याला प्रोडक्ट आवडल्यास त्यावर क्लिक करून ऑनलाइन ऑर्डर करेल. अशाप्रकारे तुम्ही प्रोडक्ट्सची विक्री करून इंस्टाग्रामच्या माध्यमातून कमाई करू शकता.

​सोशल मीडिया इंफ्लूएन्सर

इंस्टाग्रामच्या माध्यमातून रातोरात लोकप्रिय झालेल्यांची संख्या कमी नाही. इंस्टाग्राममुळे अनेक यूजर्सला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. सोबतच, हा प्लॅटफॉर्म कमाईचे देखील मोठे माध्यम आहे. सोशल मीडिया इंफ्लूएन्सर म्हणून इंस्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करू शकता. यासाठी तुमचे कमी कमी ५ हजार फॉलोअर्स असणे गरजेचे आहे. तसेच, एंगेजमेंट रेट देखील चांगला असला पाहिजे. तुमचे जेवढे अधिक फॉलोअर्स असतील, तेवढी अधिक कमाई करू शकता. फॉलोअर्स जास्त असल्यास कंपन्या देखील ब्रँडिंगसाठी संपर्क करतील.

​कंपनी देईल कमिशन

सोशल मीडियाद्वारे कमाई करायची असल्यास तुमचे फॉलोअर्स जास्त असणे गरजेचे आहे. जेवढे जास्त फॉलोअर्स, तेवढी अधिक कमाई. तुम्ही पेड कॅम्पेनद्वारे मोठी कमाई करू शकता. याशिवाय इंस्टाग्राम पेजवर एखाद्या प्रोडक्टबाबत माहिती देऊन देखील कमाई करता येते. यात तुम्हाला कंपनीच्या प्रोडक्ट्सची माहिती फॉलोअर्सला द्यावी लागेल. जर फॉलोअर्सने त्या कंपनीची सर्व्हिस घेतल्यास तुम्हाला त्याचे कमिशन मिळेल. याशिवाय फॉलोअर्सने काही कूपन कोड वापरून प्रोडक्ट खरेदी केल्यावरही कमिशन मिळते.

​अशीही करता येईल कमाई

इंस्टाग्रामवर केवळ जास्त फॉलोअर्स असल्यास तुमची कमाई होईल, असेही नाही. तुम्ही कोणत्या विषयावरील माहिती, फोटो, व्हिडिओ शेअर करता त्यावरही काही गोष्टी अवलंबून असतात. अनेक फॅशन ब्रँड, रेस्टोरेंट तसेच इतर कंपन्या तुमच्या कंटेंटच्या आधारवर पेड प्रमोशनसाठी संपर्क करतात. याशिवाय तुम्ही कोचिंग अथवा कंसल्टेंट सर्व्हिस देऊन देखील पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून कमाई कशी करू शकता, याची फॉलोअर्सला माहिती द्यावी लागेल. थोडक्यात, सर्व खेळ हा फॉलोअर्सचा आहे. जर तुमचे फॉलोअर्स जास्त असतील व एंगेजमेंट रेट देखील जास्त असल्यास तुम्ही इंस्टाग्रामवरून कमाई करू शकता.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here