स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर वाढल्याने अनेक गोष्टी घरबसल्या करणे शक्य झाले आहे. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही बाजारात न जाता घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग करू शकता. आज घरबसल्या कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फळे-भाजीपाला यासह अनेक वस्तू सहज ऑर्डर करू शकता. विशेष म्हणजे यासाठी खास साइट्स देखील उपलब्ध असून, यावरून तुम्ही एका क्लिकवर वस्तू खरेदी करू शकता. ऑनलाइन शॉपिंग करण्याचे अनेक फायदे-तोटे देखील आहे. ऑनलाइन शॉपिंग करताना अनेकदा बंपर ऑफर्समुळे तुम्ही निम्म्या किंमतीत वस्तू खरेदी करू शकता. अनेक महागड्या वस्तू ई-कॉमर्स साइट्सवर स्वस्तात उपलब्ध असतात. विशेष म्हणजे तुम्हाला अनेक वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करता येतात. आम्ही तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या याची माहिती देत आहोत, जेणेकरून तुम्ही सुरक्षितरित्या व बंपर डिस्काउंटसह प्रोडक्ट्स खरेदी करू शकता.

​वीकेंड्सवर शॉपिंग करणे टाळा

अनेकजण वीकेंड्सला सुट्टी असल्याने या दिवशी शॉपिंग करतात. मात्र, वीकेंड्सला शॉपिंग केल्याने जास्त डिस्काउंट भेटते, असा विचार करत असाल तर हे चुकीचे आहे. कारण, वीकेंड्सला बहुतांशजण प्रोडक्ट्स खरेदी कर असतात, त्यामुळे ऑफर्स आणि डिस्काउंट तर सोडा, उलट प्रोडक्ट्स जास्त किंमतीत उपलब्ध असतात. अनेकदा प्रोडक्ट्स आउट ऑफ स्टॉक देखील होतात. त्यामुळे प्रामुख्याने इतर दिवशी शॉपिंग केल्यास तुम्हाला जास्त डिस्काउंट देखील मिळण्याची शक्यता असते.

​कार्टमध्ये प्रोडक्ट सेव्ह करू नका

अनेकदा आपण ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर वेगवेगळे प्रोडक्ट्स पाहत असतो. काही प्रोडक्ट्स खरेदी करतो तर काही आवडलेले प्रोडक्ट्स आपण नंतर खरेदीसाठी कार्टमध्ये सेव्ह करून ठेवतो. मात्र, अनेकदा ते प्रोडक्ट्स नंतर खरेदी करायला गेल्यावर त्यांची किंमत वाढलेली असते. यामागचे ठोस कारण सांगता येणार नाही, पण अनेकजणांसोबत हे झाले आहे. त्यामुळे कार्टमध्ये प्रोडक्ट जमा करून नंतर खरेदी करणे टाळावे. यामुळे तुम्हाला प्रोडक्ट्स स्वस्त मिळतील.

​डेबिट कार्डचा वापर टाळा

ऑनलाइन शॉपिंगचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही थेट डेबिट/क्रेडिट कार्ड अथवा नेटबँकिंगच्या माध्यमातून आधीच पैसे पे करू शकता. याशिवाय प्रोडक्ट्सला ईएमआयवर देखील खरेदी करता येते. मात्र, शक्य झाले तर डेबिट कार्डचा वापर करून प्रोडक्ट खरेदी करू नये. यामागचे कारण म्हणजे डेबिट कार्ड्सवर कमी ऑफर्स उपलब्ध असतात. अशावेळी जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर केल्यास जास्त ऑफर्सचा फायदा मिळेल. तुम्हाला एक्स्ट्रा बोनसचा देखील फायदा होईल.

​कॉइन्स आणि पॉइंट्सचा करा वापर

अनेकदा शॉपिंग गेल्यानंतर तुम्हाला कॉइन्स अथवा पॉइंट्स दिले जातात. पुढील वेळेस शॉपिंग करताना तुम्ही या कॉइन्स अथवा पॉइंट्सचा वापर केल्यास तुम्हाला प्रोडक्ट्स कमी किंमतीत मिळेल. याशिवाय प्रोडक्ट्सवर वेगवेगळ्या ऑफर्स देखील उपलब्ध असतात. या कूपन कोड्सचा देखील उपयोग करून प्रोडक्ट्सला स्वस्तात खरेदी करू शकता. अनेक थर्ड पार्टी वेबसाइट्स देखील आहेत, जेथे तुम्हाला कूपन कोड्स मिळतील. या कूपन्सचा वापर केल्यास तुम्हाला वस्तू स्वस्तात मिळेल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here