टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ, वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएलकडे वेगवेगळ्या किंमती आणि वैधतेसह येणाऱ्या प्रीपेड प्लान्सची मोठी रेंज उपलब्ध आहे. दररोज ०.५ जीबी डेटापासून ते दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारे शानदार प्लान्स कंपन्यांकडे उपलब्ध आहेत. तुम्ही जर जास्त डेटा वापरत असाल व दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारे प्लान्स शोधत असाल तर टेलिकॉम कंपन्यांकडे असेच काही शानदार रिचार्ज उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये यूजर्सला दररोज ३ जीबी डेटासह देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जात आहे. यातील काही प्लान्स अतिरिक्त बेनिफिट्ससह येतात. काही प्लान्समध्ये डिज्नी+ हॉटस्टार आणि अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सारख्या अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ, बीएसएनएल आणि वोडाफोन आयडियाच्या दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणाऱ्या अशाच काही स्वस्त प्लान्सविषयी जाणून घेऊया.

​Jio चे दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारे प्लान्स

jio-

जिओच्या ४१९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस असून, यामध्ये दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो.

कंपनीच्या ६०१ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग दररोज ३ जीबी डेटासह अतिरिक्त ६ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस, जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस आणि डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

तसेच, कंपनीच्या १,१९९ रुपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो.

कंपनीच्या ४,१९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३६५ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो.

​Airtel चे ३ जीबी डेटासह येणारे प्रीपेड प्लान

airtel-

एअरटेलच्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच, डिज्नी+ हॉटस्टार अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे ३० दिवसांचे मोफत ट्रायल, एअरटेल थँक्स अ‍ॅप्स बेनिफिट्स मिळतात.

कंपनीच्या ६९९ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे ३० दिवसांचे मोफत ट्रायल, एक्सस्ट्रीम मोबाइल पॅक बेनिफिट्स मिळतात.

​Vi चे दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारे प्रीपेड प्लान्स

vi-

कंपनीच्या ४७५ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, बिंज ऑल नाइट, डेटा रोलओव्हर, डेटा डिलाइट्स आणि वीआय मूव्हीज अँड टीव्हीचा अ‍ॅक्सेस मिळतो.

कंपनीच्या ६०१ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटासह अतिरिक्त १६ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देखील मिळतील. तसेच, Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळेल. कंपनीकडे ५६ दिवसांच्या वैधतेसह येणारा ६९९ रुपयांचा देखील प्लान आहे. यात ४७५ रुपयांच्या प्लानमधील सर्व बेनिफिट्स मिळतात.

कंपनीच्या ९१० रुपयांच्या प्लानमध्ये ७० दिवसांची वैधता मिळते. यात देखील ४७५ रुपयांच्या प्लानमधील सर्व बेनिफिट्स मिळतात. सोबतच, डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

​BSNL चे दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारे प्लान्स

bsnl-

बीएसएनएलच्या ९४ रुपयांच्या प्लानमध्ये ७५ दिवसांसाठी ३ जीबी डेटा आणि कॉलिंगसाठी १०० मिनिटं मिळतात. तर १०६ रुपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवसांसाठी ३ जीबी डेटा आणि कॉलिंगसाठी १०० मिनिटं मिळतात.

कंपनीकडे १८० दिवसांच्या वैधतेसह येणारा ९९७ रुपयांचा प्लान आहे. यामध्ये दररोज ३ जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात.

कंपनीकडे २,९९९ रुपयांचा देखील शानदार प्लान उपलब्ध असून, यात ४५५ दिवसांसाठी दररोज अनलिमिटेड कॉलिंग, दररोज ३ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here