स्मार्टफोन मार्केट आणि स्मार्टफोन युजर्स करीता मागील आठवडा खूप खास आणि बिझी ठरला असून गेल्या आठवड्यात काही दमदार स्मार्टफोन्सने बाजारपेठेत धडक दिली आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर कदाचित हीच योग्य वेळ आहे. कारण, मागील आठवड्यात जवळ-जवळ प्रत्येक किंमत श्रेणीचे स्मार्टफोन लाँच झाले आहेत. जर तुमचे बजेट कमी असेल तरी देखील तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करता येईल आणि जर तुम्ही थोडे पैसे खर्च करण्यास तयार असाल तरीही तुमच्याकडे लेटेस्ट पर्याय उपलब्ध असतील. आज आम्ही तुमच्या सोयीसाठी, गेल्या आठवड्यात लाँच झालेल्या काही खास फोनची लिस्ट तयार केली आहे. या लिस्टमध्ये Samsung, Redmi, Vivo, Tecno यासह अनेक नामांकित कंपन्यांच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. अशा परिस्थितीत तुम्ही फोन खरेदी करणार असाल तर त्यापूर्वी ही लिस्ट नक्की पाहा.

Samsung Galaxy S 22 Series

samsung-galaxy-s-22-series

सॅमसंगने फ्लॅगशिप Galaxy S22 Series जाहीर केली. या मालिकेत Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra या तीन मॉडेल्सचा समावेश आहे. सॅमसंगने सध्या ते जागतिक बाजारात लाँच केले आहे आणि अद्याप भारतीय लाँचची तारीख जाहीर केलेली नाही. असे असूनही भारतात फोनचे प्री-बुकिंग सुरू झाले आहे. कंपनीने कन्फर्म केले की, भारतीय मॉडेल स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसरद्वारे समर्थित असतील. Galaxy S22 ची प्रारंभिक किंमत $ ७९९.९९ (अंदाजे ५९,९०० रुपये ) आहे तर Galaxy S22 Plus ची प्रारंभिक किंमत $ ९९९.९९ (अंदाजे ७४,८०० रुपये ) आहे. Samsung Galaxy S22 Ultra ची सुरुवातीची किंमत $१, १९९ (सुमारे ८९,७०० रुपये) आहे.

Tecno Pova 5G

tecno-pova-5g

Tecno Pova 5G हा स्मार्टफोन एकमेव 8GB LPDDR5 रॅम आणि १२८ GB UFS 3.1 स्टोरेज मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. ज्याची किंमत १९,९९९ रुपये आहे. Tecno Pova 5G फोनमध्ये ६.९ -इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा १२० Hz रिफ्रेश रेट आहे. यासोबतच, MediaTek Dimensity 900 चिपसेट, वाढवता येण्याजोगा स्टोरेज पर्याय देखील यात आहे. ३ GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट, ५० -मेगापिक्सेल ट्रिपल रीअर कॅमेरा सिस्टम, ६००० mAh च्या जबरदस्त बॅटरीसह अनेक भन्नाट फीचर्स या फोनमध्ये देण्यात आले आहे.

Vivo T1 5G

vivo-t1-5g

Vivo च्या नवीन Vivo T1 5G च्या भारतातील बेस ४ GB+१२८ GB व्हेरियंटसाठी रुपये १५,९९० रुपये, ६ GB + १२८ GB व्हेरिएंटसाठी रुपये १६,९९० आणि ८ GB+१२८ GB व्हेरिएंटसाठी रुपये १९,९९० रुपये मोजावे लागतील. स्मार्टफोनला १२० hz रिफ्रेश रेट, १८ W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर देखील आहे. स्मार्टफोनला अधिक पॉवरफुल बनविण्यासाठी ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, फोटोग्राफीसाठी Vivo T1 5G मध्ये ५०-मेगापिक्सेलचा प्रायमरी आहे.

Redmi Note 11

redmi-note-11

Redmi ने Redmi Note 10 चा उत्तराधिकारी घोषित केला, जो गेल्या आठवड्यात Redmi Note 11 म्हणून भारतात लाँच करण्यात आला . Redmi Note 11 च्या बेस ४ GB+६४ GB व्हेरिएंटची किंमत १३,४९९ रुपये आहे. तर, ६ GB+६४ GB व्हेरिएंटची किंमत १४,४९९ रुपये आणि ६ GB+१२८ GB व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे. आज, म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून Redmi Note 10 फोनची विक्री सुरू होत आहे. Dual सिम सपोर्टसह येणारा Redmi Note 11 स्मार्टफोन हा अँड्राइड ११ वर आधारित MIUI १३ वर काम करतो

Redmi Note 11S

redmi-note-11s

चीनी स्मार्टफोन कंपनीने मागील आठवड्यात भारतात Redmi Note 11S लाँच केला आहे. हे Device मागील वर्षी लाँच झालेल्या Redmi Note 10S चा उत्तराधिकारी म्हणून Redmi Note 11S ला लाँच करण्यात आले आहे. Redmi Note 11S ८ GB रॅम आणि १२८ GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. फोनच्या बेस ६ GB + ६४ GB व्हेरिएंटची किंमत १५,४९९ रुपये आहे, ६ GB + १२८ GB व्हेरिएंटची किंमत १६४९९ रुपये आहे, तर ८ GB + १२८ GB व्हेरिएंटची किंमत १७,४९९ रुपये आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here