नवी दिल्लीः भारत सरकारने करोना व्हायरसला रोखण्यासाठी आरोग्य सेतू (Aarogya Setu) नावाचा एक मोबाइल अॅप लाँच केला आहे. सरकार या अॅपच्या माध्यमातून करोनाच्या संसर्ग लोकांचे लोकेशन ट्रॅक करू शकणार आहे. तसेच सरकार या अॅपच्या माध्यमातून युजर्स रुग्णांच्या संपर्कात आहेत की नाही, याची माहिती घेवू शकतील. सरकारने याआधी करोना कवच नावाचे मोबाइल अॅप लाँच केलेले आहे.

आरोग्य सेतू अॅप युजर्सच्या स्मार्टफोनची लोकेशन ट्रॅक करतो. तसेच हे अॅप ब्लूटूथच्या माध्यमातून युजर्स करोना व्हायरस संसर्ग रुग्णांच्या संपर्कात आहे की नाही, हे तपासता येते. तसेच या दोघांमध्ये किती अंतर आहे, याची माहिती उघड होते. तसेच या अॅप्सवर कोविड १९ पासून कसे वाचू शकतो, या संदर्भात टिप्स मिळत राहते. आरोग्य सेतू मोबाइल अॅपमध्ये एक चॅटबॉक्स आहे. जो युजर्संना या व्हायरस संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. तसेच युजर्समध्ये या व्हायरसची लक्षणे आहेत की नाही, हे सांगितले जाते. तसेच या अॅपमध्ये अनेक राज्यांची हेल्पलाइन नंबर्स आहेत.

सरकारने काही दिवसांपूर्वी करोना व्हायरसला रोखण्यासाठी एक खास मोबाइल अॅप करोना कवच (Corona Kavach) लाँच केले होते. या अॅप्सच्या मदतीने लोकांना करोना व्हायरसचा धोका किती वाढला आहे, यासंदर्भात माहिती मिळत होती. तसेच करोना रोखण्यासाठी काय उपाय योजना केल्या पाहिजेत या विषयी माहिती मिळत होती.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here