नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. करोनापासून वाचण्यासाठी गुगने एक खास डूडल साकारले आहे. गुगलने एका डुडलमधून खास संदेश दिला आहे. लोकांनी घरात राहावे आणि आपले आयुष्य वाचावे यासाठी या खास टिप्स गुगलने दिल्या आहेत. ( SAVE LIVES) गुगलने जे डुडल बनवले आहे. ते प्रत्येक अक्षर घरात राहण्यासाठी सूचना करते. यात गिटार वाजवणे, पुस्तक वाचणे, व्यायाम करणे, मित्रांशी फोनवरून बोलणे आदींचा यात समावेश आहे.

गुगलच्या या डूडलला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी करोना व्हायरस टीप्सच्या पेजवर जाता येते. या ठिकाणी लोकांना काही सूचना करण्यात आल्या आहेत. करोनाला रोखण्यासाठी या टीप्सचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. करोनामुळे जगभरातील मृत्युमुखींची संख्या ही ५३ हजारांवर पोहोचली आहे. तर १० लाखांहून अधिक जणांना याची लागण झाली आहे.

करोना व्हायरस रोखण्यासाठी अशी मदत करा

>> घरात राहा

>> अंतर राखा

>> हात स्वच्छ धुवा

>> खोकताना नेहमी रुमाल तोंडाला लावा

>> सर्दी, खोकला झाल्यास तत्काळ डॉक्टरांची भेट घ्या

गुगल डूडलने या पेजवर करोनाला हरवण्यासाठी खूप महत्त्वाची माहिती सांगितली आहे. करोना रोखण्यासाठी सध्या कोणत्याही प्रकारचे औषध नाही. त्यामुळे स्वतः सुरक्षित राहणे हाच पर्याय आहे. स्वतः ला सुरक्षित ठेवल्यास आपोआप दुसरे सुरक्षित राहतील. त्यासाठी गुगलने खास टीप्स सांगितल्या आहेत.

>> आपले हात नेहमी स्वच्छ धुवा. तसेच सॅनिटायझर हाताला लावा.

>> खोकताना किंवा शिंकताना नाकावर रुमाल धरा. हात नेहमी तोंडाला लावू नका.

>> रुग्णापासून एक मीटरच्या अंतराने राहा.

>> एकांतात राहा

>> हात स्वच्छ नसेल तर तोंडाला, नाकाला, डोळ्याला स्पर्श करू नका

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here