फोनचा वापर वाढल्यामुळे युजर्स हमखास एकाहून अधिक सिम कार्ड वापरत असल्याचे दिसून येते. एकाच व्यक्ती अनेक सिम कार्ड वापरत असल्यामुळे सिम कार्ड फसवणूकीचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सिम कार्ड खर्डी करणाऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) आणि दूरसंचार विभाग (DoT) सिम कार्डच्या फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी सतत काम करत आहेत. दूरसंचार विभागाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ९ हून अधिक सिम कार्ड ब्लॉक करण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. मात्र, असे असतानाही सिमकार्डच्या घटना थांबता थांबत नाहीये. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती नवीन सिम कार्ड खरेदी करणार असल्यास काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. काही नवीन काही खास गोष्टींची काळजी घेतल्यास सिम कार्डच्या फसवणुकीच्या घटनांना आळा बसू शकतो . याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

फ्रॉड झाल्यास सिम ब्लॉक करा

Fraud सिम कसे शोधायचे आणि ब्लॉक कसे करायचे? सर्वप्रथम तुम्हाला https://www.tafcop.dgtelecom.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. आणि तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर भरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला वन टाइम पासवर्ड (OTP) मिळेल. ओटीपी सबमिट केल्यानंतर, एक यादी दिसेल, जिथून तुम्हाला कळेल की, तुमच्या आधारवर किती क्रमांक नोंदणीकृत आहेत. त्यानंतर तुम्ही वापरत नसलेला नंबर ब्लॉक करा. ग्राहकाला एक ट्रॅकिंग आयडी दिला जातो. जेणेकरून आधारवर अवैध क्रमांक जारी करणार्‍यावर काय कारवाई करण्यात आली आहे हे कळेल?

​सिम कार्ड तपशील तपासा

सिम कार्ड तपशील तपासा: सिमकार्ड खरेदी करतांना हे करणे देखील आवश्य्क आहे. तुमच्या नावाने जारी केलेले कोणतेही बनावट सिम आहे की नाही हे तुम्ही वेळोवेळी तपासत राहिले पाहिजे. तुमच्या आधारवर कोणते सिम कार्ड नोंदणीकृत आहे? हे शोधण्यासाठी, DoT ने फसवणूक व्यवस्थापन आणि ग्राहक संरक्षण किंवा TAFCOP साठी टेलिकॉम अॅनालिटिक्स नावाचे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवरून तुमच्या नावावर किती सिम चालू आहेत हे कळू शकते. या पोर्टलच्या मदतीने तुम्ही सिम कार्डचे तपशील तपासू शकता.

अधिकृत दुकानातून सिम खरेदी करा

फक्त अधिकृत दुकानातून सिम खरेदी करा: नेहमी प्रमाणित ठिकाणाहून सिम कार्ड खरेदी करा. कारण, कोणत्याही स्थानिक ठिकाणाहून सिम कार्ड खरेदी केल्याने तुमच्या कागदपत्रांचा गैरवापर होऊ शकतो. सिम विक्रेते तुमच्या डॉक्युमेंटवर इतरांना सिमकार्ड देत असल्याचे अनेकदा दिसून येते. कोणत्याही गुन्हेगारी घटनेच्या बाबतीत तुम्हाला दोषी ठरविले जाऊ शकते. म्हणूनच अधिकृत दुकानातून सिम खरेदी करणे केव्हाही चांगले. तुम्ही Airtel, Jio, BSNL आणि Vodafone-Idea Store मधून सिम खरेदी करू शकता.

​प्री-अॅक्टिव्हेटेड सिम कार्ड

प्री-अॅक्टिव्हेटेड सिम कार्ड : नवीन सिम कार्ड खरेदी करतांना आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे वापरकर्त्यांनी नेहमी प्री-अॅक्टिव्हेटेड सिम कार्ड खरेदी करणे टाळावे. यामागील कारण देखील तसेच आहे. तुम्ही जर प्री -ऍक्‍टिव्हेटेड सिम खरेदी केले तर, साहजिकच ते इतर कोणाच्या तरी नावाने जारी केले गेले आहे.अशात कधी-कधी तुमच्या डॉक्युमेंट्सवर सिम कार्ड दुसऱ्याला जारी केले जाऊ शकते. अशा स्थितीत कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता आणि तुमचे मोठे नुकसान देखील होऊ शकते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here