Realme Narzo 50i

realme narzo 50i (Mint Green, 4GB RAM + 64GB Storage)
या फोनची किंमत ९,९९९ रुपये आहे. पण, डिस्काउंटनंतर हा फक्त ८,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच, सिटीबँक आणि येस बँक कार्ड पेमेंटवर रु. १५०० रुपयांचा झटपट कॅशबॅक आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले आहे. यात ४ GB रॅम, ६४ GB स्टोरेज आहे, जे २५६ GB पर्यंत वाढवता येऊ शकते. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर आहे ज्यामध्ये मुख्य कॅमेरा १३ MP आहे. दुसरीकडे, २ MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २ MP मॅक्रो लेन्स कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ८ MP मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Tecno Pop 5 LTE

Tecno Pop 5 LTE(Turquoise Cyan 2G+32G)
या फोनची किंमत ८,९९९ रुपये आहे . पण पूर्ण ३० % डिस्काउंट मिळाल्या नंतर हा फोन ६,२९९ रुपयांना खरेदी करता येईल. या फोनमध्ये २ GB रॅम + ३२ GB स्टोरेज देण्यात आले आहे. जे मायक्रोएसडी कार्डद्वारे २५६ GB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये ८ MP प्रायमरी कॅमेरासह ड्युअल रियर कॅमेरा आहे. Tecno Pop 5 LTE फोनमध्ये ६.५ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये मागील आरोहित फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेशियल रेकग्निशन देखील आहे. फोनला अधिक पॉवर देण्यासाठी फोनमध्ये ५, ००० mAh बॅटरी आहे.
Nokia C20 Plus

Nokia C20 plus: बजेट यूर्जसाठी Nokia C20 plus देखील एक चांगलं पर्याय आहे. Nokia C20 plus कमी बजेटमध्ये म्हणजेच ७,९९९ रुपयांना उपलब्ध आहे, ज्याची MRP १०,४९९ रुपये आहे. सध्या या फोनवर २४ % सूट देण्यात येत आहे. Nokia C20 plus फोनमध्ये ८ MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Nokia C20 plus मध्ये ५००० mAH बॅटरी आहे. यात ६.५ इंचाचा डिस्प्ले आहे. याव्यतिरिक्त, यात ३ GB रॅम आणि ३२ GB स्टोरेज आहे.
Redmi 9A Sport

Redmi 9A Sport (Coral Green, 3GB RAM, 32GB Storage)
हा कमी किमतीच्या स्मार्ट फोनमध्ये देखील सर्वोत्तम पर्याय आहे. या फोनची किंमत ९,४९९ रुपये आहे परंतु ऑफरमध्ये फोन फक्त ७,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनचा मुख्य कॅमेरा १३ +२ MP आहे आणि फ्रंट कॅमेरा AI पोर्ट्रेटसह ५ MP आहे. या फोनचा प्रोसेसर MediaTek Helio G25 Octa-core आणि HD डिस्प्लेसह ६.५३ -इंच स्क्रीन आहे. फोनमध्ये ५००० mAH ची बॅटरी देण्यात आली आहे. ३ GB रॅम आणि ३२ GB स्टोरेजसह ड्युअल सिम पर्याय आहे.
Redmi 9A

Redmi 9A, Redmi 9A (Midnight Black 2GB RAM 32GB Storage)
या फोनची एमआरपी ८४९७ रुपये आहे, परंतु सेलमध्ये हा सर्वात कमी किंमतीत ७४९९ रुपयांना मिळत आहे. या फोनमध्ये AI पोर्ट्रेट, AI सीन रेकग्निशन, HDR, प्रो मोड आणि ५ MP सेल्फी कॅमेरासह १३ MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi 9A फोनची स्क्रीन ६.५३ इंच आहे आणि त्यात एचडी + मल्टी-टच कॅपेसिटिव्ह टचस्क्रीन आहे. फोनमध्ये ३ GB रॅम आणि ३२ GB इंटरनल मेमरी आहे जी ५१२ GB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये ड्युअल सिमचा पर्याय आहे ज्यामध्ये दोन नॅनो सिम घेता येतील.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times